धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरला, अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल
Indian Railway: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असते, परंतु कधीकधी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अपघाताच्या काही घटना या समोर येत असतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) देखील तयार करण्यात आलं आहे. आरपीएफ जवानांनी अनेकदा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. नुकतीच अशीच एक घटना वसई रोड रेल्वे स्थानकावर घडली आहे. ज्यामध्ये आरपीएफच्या जवानांनी धावत्या ट्रेनमधून […]
ADVERTISEMENT
Indian Railway: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असते, परंतु कधीकधी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अपघाताच्या काही घटना या समोर येत असतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) देखील तयार करण्यात आलं आहे. आरपीएफ जवानांनी अनेकदा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. नुकतीच अशीच एक घटना वसई रोड रेल्वे स्थानकावर घडली आहे. ज्यामध्ये आरपीएफच्या जवानांनी धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे.
ADVERTISEMENT
वास्तविक, हा प्रवासी वसई रोड स्थानकावर धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरपीएफचे हवालदार रामेंद्र कुमार यांनी प्रवाशाला वाचवण्याची तत्परता दाखवली आणि धाव घेत त्याला सुखरूप वाचवले. पश्चिम रेल्वेने या घटनेशी संबंधित व्हिडिओ ट्विटरवर देखील पोस्ट केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना पश्चिम रेल्वेने असं म्हटलं आहे की, ‘आरपीएफ कॉन्स्टेबल रामेंद्र कुमार यांनी मुंबईच्या वसई रोड स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात खाली पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी तत्परता दाखवली. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा/उतरण्याचा प्रयत्न करू नये.’
हे वाचलं का?
सतर्कता से बची यात्री की जान
मुंबई के वसई रोड स्टेशन पर RPF कांस्टेबल रामेन्द्र कुमार ने तत्परता दिखाते हुए एक यात्री की जान बचाई, जो चलती ट्रेन में चढ़ते का प्रयास करते हुए गिर गए थे।
यात्रियों से निवेदन है,चलती ट्रेन में चढ़ने/उतरने का प्रयास न करें।@RailMinIndia @drmbct pic.twitter.com/dimaXjYwgA
— Western Railway (@WesternRly) January 24, 2022
या व्हिडिओला अवघ्या काही तासात हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा 24 सेकंदांचा व्हिडिओ इतर ट्विटर हँडलवरही अपलोड करण्यात आला आहे. ज्यानंतर तो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. सध्या लोक आरपीएफ जवानाचे खूप कौतुक करत आहेत.
महेंद्र नावाच्या एका युजरने लिहिले आहे की, ‘आरपीएफ जवानाने खूप चांगले काम केले आहे.’ त्याचवेळी एन भारद्वाज नावाच्या युजरने म्हटले की, ‘खूप चांगले, उत्तम काम. आरपीएफ जवानाला माझा खास सॅल्यूट’
ADVERTISEMENT
रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे पुण्यातील शेकडो रेल्वे प्रवाशांचे वाचले प्राण
ADVERTISEMENT
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकावर एका अंध महिलेचा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी एका मयूर शेळके नावाच्या रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या प्राणांची बाजी लावून त्या मुलाचा जीव वाचवला होता. ज्यानंतर मयूर शेळकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर एक मुलगा तोल जाऊन ट्रॅकवर पडला होता. यावेळी तिथे असलेल्या पॉईंटमन मयूर शेळके याने ही घटना पाहिली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने मुलाच्या दिशेने धाव घेत मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं. त्याचप्रमाणे तो स्वतःही तातडीने प्लॅटफॉर्मवर चढला. या सगळ्यात आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या मयूरला रेल्वेने बक्षिसही जाहीर केलं होतं. तसेच जावाकडूनही त्याला नवी कोरी मोटरसायकल भेट देण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT