युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. मंगळवारीच एका भारतीय विद्यार्थ्याचा संघर्षात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. युद्धाची भूमी झालेल्या युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आलं आहे. अशातच […]
ADVERTISEMENT

युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. मंगळवारीच एका भारतीय विद्यार्थ्याचा संघर्षात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. युद्धाची भूमी झालेल्या युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आलं आहे. अशातच आता आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चंदन जिंदाल या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तो मूळचा पंजाबचा होता. 2018 मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तो युक्रेनला गेला होता. त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो बेशुद्ध झाला होता आणि उपचारादरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. चंदन जिंदाल हा तरूण युक्रेनच्या विनित्सिया शहरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. या आधी कर्नाटकच्या नवीन नावाच्या मुलाचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला ही माहिती मंगळवारी समोर आली होती. तो किराणा सामान आणण्यासाठी सुपर मार्केटला गेला होता त्यावेळी शेलिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं.
#Watch | Chandan Jindal, an Indian national in Ukraine's Vinnytsia lost his life due to natural causes. His family members are also in Ukraine: Arindam Bagchi, MEA spokesperson pic.twitter.com/zeH0V9k124
— ANI (@ANI) March 2, 2022
दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाने एक अॅडव्हायजरी लागू केली आहे. ज्यानुसार खार्किव्हमधून सर्व भारतीयांना हे शहर सोडण्यास सांगितलं आहे. असाल तसे खार्किव्हमधून बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे. आज तकच्या बातमीनुसार ही अॅडव्हायजरी लागू केल्यानंतर एक क्रूज मिसाईल सिटी कौन्सिलच्या इमारतीवर आदळलं आहे.
धगधगतं युक्रेन! बेलारुसच्या सीमेवर रशियन शिष्टमंडळाला भेटण्यास तयार- झेलेन्स्की









