Income Tax Portal : इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना अर्थ मंत्रालयाकडून समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सीईओ तथा व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांना समन्स बजावलं आहे. अर्थ मंत्रालयाने नव्याने ई-फाईलिंग पोर्टल लॉन्च केलं आहे. मात्र, अडीच महिन्यांपासून त्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पारेख यांना समन्स बजावण्यात आलं असून, त्यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

ADVERTISEMENT

प्राप्तिकर अर्थात इन्कम टॅक्स इंडियाच्या ट्विटर हॅण्डलवरून रविवारी एक ट्विट करण्यात आलं. ज्यात इन्फोसिसचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांना समन्स बजावण्यात आलं असल्याचं म्हटलेलं आहे.

‘अर्थ मंत्रालयाने इन्फोसिसचे सीईओ तथा एमडी सलील पारेख यांना समन्स बजावलं आहे. २३ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांना हजर राहावं लागणार आहे. नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होऊन अडीच महिने झाले तरी पोर्टलमधील तांत्रिक अडचणी का सोडवता आलेल्या नाहीत, याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्पष्टीकरण देण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. २१ ऑगस्ट पासून पोर्टल कार्यरत नाही’, असं इन्कम टॅक्स इंडियाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्राप्तिकर भरण्यासंदर्भात नवीन ई-फायलिंग पोर्टल लॉन्च केलं आहे. मात्र, हे पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे चर्चेत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जून महिन्यात या पोर्टलबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत पोर्टलसंदर्भात बैठकही घेतली होती.

ADVERTISEMENT

इन्फोसिसने नवीन ई-फायलिंग पोर्टल तयार केलेलं आहे. सात जून रोजी पोर्टल लॉन्च करण्यात आलं. तेव्हापासून कर भरणा करताना नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. प्रोफाईल अपडेट करण्यापासून ते पासवर्ड बदलानाही करदात्यांना अडचणी येत असल्याचं समोर आलं होतं.

ADVERTISEMENT

वार्षिक प्राप्तिकर भरण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं. मात्र, करदात्यांच्या तक्रारी सुरू झाल्या. तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. मात्र, अद्यापही तांत्रिक अडचणी कमी झालेल्या नाहीत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT