मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी निषेध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्याने ही शाईफेक केली अशी चर्चा आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आले असता त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून ही शाईफेक करण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता तरीही ही घटना घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी एकाला या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात चंद्रकांत पाटील यांचा निषेध

भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी, औरंगाबाद येथे एका कार्यक्रमा दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या.शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही.तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली.

हे वाचलं का?

शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत. असे विधान केल्यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेते आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले असून आज पुण्यातील कोथरूड येथील चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

चंद्रकांत पाटील यांच्यावर उद्धव ठाकरेंची टीका

आमच्या महाराष्ट्रात अनेक लेणी आहेत. ती लेणी भग्न झाली आहेत मात्र साधूसंतांचे संस्कार, विचार मात्र कायमच आहे. आज आपण काय पाहतो आहोत, उच्च शिक्षण मंत्री म्हणतात पूर्वी भीक मागून संस्था काढल्या. काय बोलणार ? ज्ञानेश्वर कुठल्या शाळेत शिकले होते? तुकाराम महाराज कुठल्या शाळेत शिकले? तुम्ही आता जे शिक्षण देत आहात ते काही भीक मागण्यासाठी देत आहात का? गावं ही आपलं मूळं आहेत. त्यामुळेच ग्रामीण साहित्य महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील भीक मागण्याचं वक्तव्याबाबत मी कुसुमाग्रजांच्या ओळी त्यांना सुनावतो. नाही पसरला कर कधी मागायास दान, आम्ही कधी दान मागण्यासाठी हात पसरले नाहीत. सुवर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान ही आमची मराठी आहे. तुम्ही तुमच्या सिंहासनावर जे बसले त्यांच्यापुढे माना तुकवता. उद्या ते येत आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यांवर पांघरूण घालतील. आम्हाला टोमणे मारतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT