Instagram चं नवं फिचर आहे जबरदस्त! आता इन्स्टा स्टोरी 24 तासांऐवजी…
what is Instagram my week feature : इन्स्टाग्रामवर ठेवल्या जाणाऱ्या स्टोरी साठी मेटा ने नवीन फीचर आणण्याचं काम सुरू केले आहे. ज्याचा फायदा यूजर्संना होणार आहे.
ADVERTISEMENT
Instagram new story feature : मेटा त्याच्या सोशल मीडिया अॅप्सवर यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी सतत नवीन फीचर्स जोडत आहे. आता कंपनी आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे. इन्स्टाग्राम नवीन My Week फीचरची चाचणी करत आहे, ज्यामुळे यूजर्संना त्यांची स्टोरी संपूर्ण आठवड्यासाठी ठेवता येणार आहे. हे फीचर अद्याप लोकांसाठी उपलब्ध झालेले नाही, परंतु ते लवकरच आणले जाऊ शकते. रिव्हर्स इंजिनीअर अलेसेंड्रो पलुझी यांनी ही माहिती दिली आहे. (Instagram will launch my week feature for Insta story)
ADVERTISEMENT
माय वीक फीचरमुळे यूजर्संना त्यांची स्टोरी 24 तासांपेक्षा जास्त काळ लाइव्ह ठेवता येणर आहे. सध्या, इंस्टाग्राम यूजर्स केवळ 24 तासांसाठी एक स्टोरी सेट करू शकतात, परंतु नवीन फीचर लॉन्च झाल्यानंतर यूजर्संना 7 दिवसांसाठी एका प्रोफाइलवर स्टोरी शेअर करता येतील.
हे ही वाचा >> Rohit Sharma : ‘खरं सांगायचं तर…’, रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?
याशिवाय यूजर्सची इच्छा असेल, तर ते मधली कोणतीही स्टोरी हटवू शकतात किंवा नवीन स्टोरी अॅड करू शकतील.
हे वाचलं का?
Instagram new Update : काय होईल फायदा ?
या फीचरचा त्या क्रिएटर्संना फायदा होईल जे प्रवास करतात आणि त्यांची स्टोरी लाखो लोकांपर्यंत पोहोचू इच्छितात. याशिवाय, या फीचरच्या मदतीने क्रिएटर्संना आगामी कार्यक्रमांबद्दल माहिती देणे सोपे होईल आणि त्यांना स्टोरीतील कोणत्याही प्रकल्पाच्या रिलीजबद्दल लोकांना वारंवार अपडेट करावे लागणार नाही.
हे ही वाचा >> मॅक्सवेलने कोहलीला मारला चेंडू, नंतर विराटने…; व्हिडिओ झाला व्हायरल
ही गोष्ट लक्षात घ्या की हे फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. माय वीक फीचर अद्याप विकसनशील मोडमध्ये म्हणजे विकसित केले जात आहे आणि ते कधी येईल याबद्दल निश्चित माहित समोर आलेली नाही.
ADVERTISEMENT
… इतर कोणते फीचर्स
इन्स्टाग्राम एकाच वेळी अनेक फीचर्ससह प्रयोग करण्यासाठी ओळखले जाते. या नवीन कार्यक्षमता पूर्णपणे विकसित आणि व्यापकपणे उपलब्ध होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अलीकडे, मेटाने Instagram अपडेट केले आणि नवीन फीचर्स जोडले. अॅपवर रील तयार करताना यूजर्स आता क्लिप स्केल करू शकतात, क्रॉप करू शकतात आणि फिरवू शकतात आणि ते नवीन Instagram क्लिप हबमधून ऑडिओसह क्लिप देखील जोडू शकतात. लवकरच तुम्हाला Instagram वर ‘प्लॅन इव्हेंट’, Nearby, स्टोरीजसाठी एक नवीन ट्रे (आपण फॉलो करत असलेले लोक) यासह अनेक नवीन फीचर मिळणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT