राज्यातील 49 सहकारी साखर कारखान्याची चौकशी करा, अण्णा हजारेंची ED कडे मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची ईडीने कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. ईडीने गैरव्यवहार होऊन विक्री झालेल्या राज्यातील सर्व 49 सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी. राज्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. राजकीय पक्ष काय आज आहेत उद्या नाही. मात्र सहकार चळवळ मोडीला काढणे हा खूप मोठा धोका आहे असं परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना व गुरू कमोडिया कंपनी यांचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे यापूर्वीच आले होते. ती कागदपत्रे आम्ही उच्च न्यायालयात दाखल केली आहेत. मात्र न्यायालयाने सांगितले की तुमची तक्रार दाखल पाहिजे. त्यांनतर आम्ही मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनला चार हजार पानांची तक्रार दाखल केली होती. कारखान्याची तक्रार नोंदवल्यानंतर सरकारने मात्र चौकशी करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील माणसाला नियुक्त केले व त्यांनी या प्रकरणात काही तथ्य नाही असा अहवाल सरकारला दिला. आम्ही पुन्हा आता सत्र न्यायालयात गेलो तिथं ही केस अजून प्रलंबित आहे. तिथून आता एक चांगली गोष्ट झाली की ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आता ईडीने फक्त जरंडेश्वर कारखान्याची नाही तर उरलेल्या 49 साखर कारखान्याची चौकशी करावी.सर्व कारखान्यात अशाच प्रकारचे गैरव्यवहार झालेत त्याचे गबाळ चौकशी अंती बाहेर पडेल असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

49 कारखाने कवडीमोल भावाने विकले. संगमताने सर्व कारखाने कुणाला कोणता कारखाना द्यायचे असे सर्व नियोजन करून विकण्यात आले. आता आमची विनंती एकच आहे. ईडीने या सर्व सहकारी साखर कारखान्यांची चौकशी करावी. आम्हाला कुठल्याही पक्ष व पार्टीचे घेणं देणं नाही. पण महाराष्ट्र राज्य हे असं राज्य आहे की ज्या राज्यात सहकार खातं एवढं भरभराटीस आलं होतं. त्या सहकार खात्याचे मार्गदर्शन देशाला मिळाले होते. त्यातूनच ही सर्व सहकारी कारखान्यांची चळवळ वाढली होती. त्यातूनच हे सगळे कारखाने उभं राहिले होते. धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, विठ्ठलराव विखे यांनी प्रयत्न करून राज्यात सहकार चळवळ वाढविण्यासाठी मोठं काम केलं. आपल्या राज्यातील सहकार चळवळीचे अनुकरण करत इतर राज्यांनी त्याचा आदर्श घेतला मात्र आज आपल्याच राज्यात सहकार चळवळ मोडण्याचे काम सुरु आहे याचे मला दुःख वाटत आहे असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आता ह्या राज्यात ही सहकार चळवळ मोडीत काढून खाजगीकरण मागे करण्याच्या मागे लागले आहे हा खूप मोठा धोका आहे. यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत. यात ईडीने लक्ष घातल्यामुळे आता हे प्रकरण बाहेर पडेल महाराष्ट्र राज्याच्या शिखर बँकेची चौकशी एक दोनदा नाही तर तेरा ते चौदा वेळा चौकशी झाली आहे. बँकेच्या ८८ संचालक यांच्याकडून वसुली निश्चित केली. पण सत्ता हातात असल्यावर काय होत ते आपण पहातच आहे. यात घोटाळे झाले म्हणूनच हे जे संचालक मंडळ होतं आमच्या सारखं लोकं हाय कोर्टात, सत्र न्यायालयात गेले तेंव्हा हे संचालक मंडळ बरखास्त झाले. आम्ही जे दाखल केले त्यात काही तथ्य नाही मग संचालक मंडळाला का बरखास्त झाले. त्यात काही तथ्य नाही मग संचालक मंडळ का बरखास्त झाले असा सवाल ही अण्णांनी यावेळी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT