जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमलं औरंगाबाद, शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण
इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 61 फुटी पुतळ्याचं थाटात अनावरण करण्यात आलं. शुक्रवारी रात्री 12 वाजता म्हणजेच 19 फेब्रुवारी ही तारीख लागल्यानंतर हा सोहळा पार पडला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं. औरंगाबादच्या क्रांती चौकात हातात भगवे झेंडे घेऊन असंख्य कार्यकर्ते जमले होते. औरंगाबादचा क्रांती चौक जय भवानी जय शिवाजीच्या […]
ADVERTISEMENT

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 61 फुटी पुतळ्याचं थाटात अनावरण करण्यात आलं. शुक्रवारी रात्री 12 वाजता म्हणजेच 19 फेब्रुवारी ही तारीख लागल्यानंतर हा सोहळा पार पडला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं. औरंगाबादच्या क्रांती चौकात हातात भगवे झेंडे घेऊन असंख्य कार्यकर्ते जमले होते. औरंगाबादचा क्रांती चौक जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी क्रांतीचौक दुमदुमला होता. ढोलताशांचा गजर, आतशबाजी, लेझर शो अशा थाटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या 61 फुटी पुतळ्याचं अनावरण केलं. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते हजर होते. तसंच असंख्य शिवप्रेंमीची या सोहळ्याला गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती औरंगाबादमध्ये अशा प्रकारे पहिल्यांदाच साजरी करण्यात आली.










