‘दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा’ : हे शब्द राज्यगीतामधून वगळले का?

ऋत्विक भालेकर

Jai Jai Maharashtra Maja song by shahir Sable: मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Maja) गीताला महाराष्ट्राचं (Maharashtra) राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. मंगळवारी (३१ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Jai Jai Maharashtra Maja song by shahir Sable:

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Maja) गीताला महाराष्ट्राचं (Maharashtra) राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. मंगळवारी (३१ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली होती. (Jai Jai Maharashtra Maja declare as the state anthem of Maharashtra)

वादाला सुरुवात :

एका बाजूला या गीताची राज्यगीत घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला या गीतावरुन वादाचीही सुरुवात झाली आहे. या राज्यगीताला वेळमर्यादा असल्यानं या गीतामधील काही शब्दांना कात्री लावण्यात आली आहे. पण कात्री लावलेले हे शब्द “दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा” असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. दिल्लीतील काही भाजप नेत्यांना हे वाक्य अडचणीच ठरणार असल्यानेच ते गीतामधून वगळ्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि अॅड. असीम सरोदे यांनी सुधाकर जाधव यांच्या पोस्टचा आधार घेत केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp