जळगाव : एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला खालसा; भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांकडून काम फत्ते!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनीष जोग – जळगाव :

ADVERTISEMENT

मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्याच राजकारण ढवळून काढलेल्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप-शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारत दूध संघावरील खडसे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. रविवारी जाहीर झालेल्या निकालात २० जागांपैकी १६ जागांवर भाजप-शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर केवळ 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीत सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीमधील एकनाथ खडसे, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अनेक आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनल विरुद्ध शिंदे भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली.

हे वाचलं का?

चुरशीच्या लढतीमध्येही शिंदे व भाजप गटाची बाजी :

जिल्हा दूध संघ निवडणुकीत काही लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. यात प्रामुख्याने मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरोधात शेतकरी पॅनलचे उमेदवार, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी विजय मिळवला.

तर धरणगाव मतदार संघातून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार मालतीबाई महाजन यांचा पराभव केला. जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन, तर पारोळा मतदार संघातून आमदार चिमणराव पाटील हे सुध्दा विजयी झाले आहेत.

ADVERTISEMENT

तब्बल सात वर्षानंतर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने सत्ता मिळवले असून एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला. निकालानंतर भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मतमोजणी केंद्राबाहेर विजयाचा जोरदार जल्लोष केला. नृत्य करत तसंच गुलालाची उधळण करत जल्लोषात आनंद साजरा केला.

ADVERTISEMENT

निकालानंतर कोण-काय म्हणाले?

दरम्यान, दूध संघ निवडणुकीतील पराभव मान्य असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. तर गळ्यांची मेहनत आणि जनतेने दिलेले प्रेम यामुळे आमच्या पॅनलचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते म्हणाले, जी आश्वासनं किंवा ज्या मागण्या होत्या ती अपेक्षित कामं पूर्ण करून दाखवणार आहे. जिल्हा दूध संघ वाचावा त्याचा विकास व्हावा यासाठी पहिल्यांदाच ही निवडणूक लढलो आणि भाजप शिंदे गटाच्या युतीला मतदारांनी कौल दिला, असही समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT