Jammu and Kashmir: 2 शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या, दहशतवाद्यांनी 3 दिवसात 5 जणांचां घेतला जीव
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य दिवसेंदिवस वाढतच आहेत. दहशतवादी आता आपली दहशत दाखवण्यासाठी थेट सामान्य नागरिकांना लक्ष्य करु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सामान्य नागरिकांची हत्या करत आहेत. आज (गुरुवार) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी गेल्या 7 दिवसात 5 नागरिकांचा बळी घेतला आहे. […]
ADVERTISEMENT

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य दिवसेंदिवस वाढतच आहेत. दहशतवादी आता आपली दहशत दाखवण्यासाठी थेट सामान्य नागरिकांना लक्ष्य करु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सामान्य नागरिकांची हत्या करत आहेत. आज (गुरुवार) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी गेल्या 7 दिवसात 5 नागरिकांचा बळी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ईदगाहच्या संगम परिसरातील शासकीय बॉईज स्कूलमध्ये गोळीबार केला. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले दुःख