‘शिवसेना एकनाथ शिंदेंना देण्याची व्यवस्था’; निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधी जयंत पाटलांचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन नावं आणि चिन्हंही दिली. असं असलं, तरी शिवसेना कुणाकडे जाणार हा निर्णय अजून व्हायचा आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलंय. जयंत पाटलांनी या प्रकरणावरून भाजपवर गंभीर आरोप केलेत.

ADVERTISEMENT

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका होताना दिसतेय. राजकीय वर्तुळातून निवडणूक आयोगाल लक्ष्य केलं जात असून, आता जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा उल्लेख करत मोठं विधान केलंय.

जयंत पाटील म्हणाले, “अडीच वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली. आता महाराष्ट्रातील जनता पूर्ण भाजपच्या विरोधात गेलीये. शिवसेनेचे जे फुटीर गट आहेत, त्यांचा पदोपदी निषेध व्यक्त व्हायला लागला आहे. त्यामुळे आता हे कुणावर घालायचं म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेस. हा त्यांचा उद्देश आहे”, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय.

हे वाचलं का?

‘कुणकुण लागताच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतलं’; आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेसनं उलट शिवसेनेला आणि काँग्रेसच्या आघाडीला पुढाकार घेऊन साथ दिली. शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केलेली असल्यानं विरोधी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी महाराष्ट्रात फिरलो, तेव्हा शिवसेनेच्या आमदारांनी माझं स्वागत केलं. त्यांनी घरी बोलवून नाश्ता, जेवणं दिलं. काहीच अडचण नाही. आमचे शिवसेनेच्या आमदारांसोबत चांगले संबंध आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

शिवसेना संपवण्याचं कारस्थान रचण्यात आलं; जयंत पाटलांचा भाजपवर आरोप

“आता काय झालं तरी प्रोफेशनली टिकायचं असेल, तर पुढचा पक्ष प्रोफोशनली फोडला पाहिजे. हा उद्देश ठेवून भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली. शिवसेना संपूर्ण संपवण्याचं कारस्थान रचण्यात आलं. आता त्यांचं नाव आणि चिन्हही काढून घेण्यात आलंय”, असा आरोप जयंत पाटील यांनी भाजपवर केलाय.

ADVERTISEMENT

Andheri east assembly : उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच, ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याने वाढवली डोकेदुखी

शिवसेना एकनाथ शिंदेंकडे जाणार? जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. हा निर्णय प्रलंबित असताना आता जयंत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलंय. “मी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या घरातली शिवसेना चोरीला गेलीये. आता ती कुणाच्या घरात मिळेल, ते थोड्या दिवसांनी कळेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची व्यवस्था ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होईल. याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. त्यामुळे शिवसेना फोडण्याचं पाप हे भाजपचं आहे. हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला कधीच महाराष्ट्रात सत्तेत येता येणार नाही, या भीतीने त्यांना ग्रासलेलं आहे. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली आहे. दुसरं कोणतंही कारण याला नाही”, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT