भाजपची वैचारिक दिवाळखोरी समोर आली – जयंत पाटलांचा हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि त्यावर बेछूट आरोप करायचे हा प्रकार चुकीचा आहे. गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर व आधारित गोष्टींवर भाजप जर सीबीआय चौकशीचा ठराव करणार असेल तर त्यांची वैचारिक दिवाळखोरी समोर आली आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

उस्मानाबाद : काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही – जयंत पाटील

मनसुख हिरेन आणि अँटेलिया बाहेरील स्फोटकांचा तपास सध्या NIA करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि अन्य महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेंनी लिहीलेलं पत्र मीडियात लिक झालं होतं. परंतू महाराष्ट्राची जनता ही दुधखुळी नाही, ही पत्र दबावाखाली लिहून घेतली जात आहेत व त्या पत्रातील उल्लेख खोटे आहेत. हातात काहीच सापडत नसल्यामुळे भाजप संशयाचं भूत निर्माण करण्यासाठी खालच्या पातळीवर उतरल्याची टीकाही जयंत पाटलांनी केली.

हे वाचलं का?

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा असा ठराव मंजूर करण्यात आला होता. याचा समाचार घेत असताना जयंत पाटलांनी महाराष्ट्राच्या विकासाची आणि प्रगतीची कार्यकारणीत चर्चा करा असा सल्ला भाजपला दिला आहे. पत्रातून खोटे आरोप करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्याच्या आरोपांवर चर्चा करायची आणि सीबीआय चौकशीचा ठराव करायचा याचा अर्थ भाजप कार्यकारणीला आता दुसरं कोणतंही काम राहिलेलं नाही असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT