JEE Main 2021 परीक्षेबाबत घेण्यात आला मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या ही अत्यंत झपाट्याने वाढत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने (JEE Main 2021 April) परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालकांकडून सातत्याने मागणी केली जात होती की, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. अखेर एनटीएने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान, परीक्षांची नवी तारीख लवकरच घोषणा केली जाईल.

ADVERTISEMENT

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, सद्यस्थिती लक्षात घेता त्यांनी एनटीएकडे परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना केली होती.

CBSE Board Exam: CBSE 10वीची परीक्षा रद्द, 12वीची परीक्षा पुढे ढकलली

हे वाचलं का?

दरम्यान, यावेळी शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, या परीक्षेच्या नवीन तारखा या 15 दिवसआधी जाहीर केल्या जातील. असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिल सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल त्यांना अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या परीक्षेच्या नवीन तारखा पाहता येतील. (april session exams postponed due to corona see new exam date information)

या वर्षी JEE Main 2021 परीक्षा ही 4 सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात 23 ते 26 फेब्रुवारी आणि दुसऱ्या सत्रात 16 ते 18 मार्च या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या परीक्षेच्या तिसरं सत्र हे 27, 28 आणि 30 एप्रिलला पार पडणार होतं. पण देशात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. दुसरीकडे, मे महिन्यात सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षा देखील साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

मोठी बातमी! Corona च्या वाढत्या प्रसारामुळे 10 वी आणि 12 वी परीक्षा पुढे ढकलल्या

ADVERTISEMENT

बोर्डाने अद्याप एप्रिल सत्राच्या परीक्षेचे हॉलतिकीट दिलेले नाहीत. नवीन परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आपण एनटीए अधिकृत वेबसाइट jeemain.nic.in वर भेट देऊन तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकाल. परीक्षे संदर्भात इतर कोणतीही माहिती अधिकृत वेबसाइटवरच जाहीर केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT