हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ लांबणीवर; रिलीजची तारिख ढकलली पुढे
राज्यात कोरोनाते रूग्ण वाढत असल्याचं लक्षात आल्यावर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. सोमवारपासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून या निर्बंधांमध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद ठेवण्यात आलीयेत. याचा फटका अनेक सिनेमांना बसलाय. यामध्ये काही सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत. तर आता झिम्मा हा मराठी सिनेमा देखील रिलीज होऊ शकणार नाहीये. येत्या 23 […]
ADVERTISEMENT
राज्यात कोरोनाते रूग्ण वाढत असल्याचं लक्षात आल्यावर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. सोमवारपासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून या निर्बंधांमध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद ठेवण्यात आलीयेत. याचा फटका अनेक सिनेमांना बसलाय. यामध्ये काही सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत. तर आता झिम्मा हा मराठी सिनेमा देखील रिलीज होऊ शकणार नाहीये.
ADVERTISEMENT
येत्या 23 एप्रिल रोजी अभिनेता हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र थिएटर्स बंद करण्यात आल्यामुळे आता हा सिनेमा काही दिवसांनी रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार हे मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
झिम्मा चा प्रवास सुरु झाला, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला…
हा प्रवास थिएटर पर्यंत रंगत जाणार अस वाटत असतानाच पुन्हा एकदा आपण सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकलो…
आता वेळ आली आहे एकमेकांची काळजी घेण्याची… कोरोनासोबत दोन हात करण्याची… pic.twitter.com/L9AwPSxvbg— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 6, 2021
यासंदर्भात झिम्माच्या टीमकडून याची माहिती देण्यात आलीये. “झिम्मा चा प्रवास सुरु झाला, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हा प्रवास थिएटर पर्यंत रंगत जाणार अस वाटत असतानाच पुन्हा एकदा आपण सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकलो. आता वेळ आली आहे एकमेकांची काळजी घेण्याची… कोरोनासोबत दोन हात करण्याची. सगळं काही सुरळीत झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने, आनंदाचा खेळ म्हणजेच झिम्मा खेळुया! सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया. लवकरच भेटूया, ‘चित्रपटगृहातच!’” असं झिम्माच्या टीमकडून सांगण्यात आलंय.
हे वाचलं का?
दरम्यान झिम्मा सिनेमाच्या टिझरला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या मराठी सिनेमाच्या टिझरची दखल घेतली होती. या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर देखील झळकणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT