Maharashtra Assembly Session : जितेंद्र आव्हाडांचं रात्रीच विधानसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

In a letter to Speaker Rahul Narvekar on Sunday, Awhad said the Nationalist Congress Party is part of the opposition, barring nine MLAs, including Ajit Pawar, who have joined the government.
In a letter to Speaker Rahul Narvekar on Sunday, Awhad said the Nationalist Congress Party is part of the opposition, barring nine MLAs, including Ajit Pawar, who have joined the government.
social share
google news

Maharashtra Politics : पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार कुठे बसणार असा प्रश्न असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच पक्षाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं आहे. या पत्रात अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांचा उल्लेख असून, त्यांनी आमदारांच्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत अध्यक्षांना विनंती केली आहे. (NCP’s Sharad Pawar camp chief whip Jitendra Awhad has written to the Speaker of the Maharashtra Legislative Assembly, demanding separate seating arrangements for members of the Ajit Pawar camp and rest of the party’s MLAs for the legislature session)

ADVERTISEMENT

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (17 जुलै) सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काय?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

वाचा >> काँग्रेस-भाजपचे मुंबईचे अध्यक्ष ट्विटरवर भिडले! आशिष शेलार-वर्षा गायकवाडांमध्ये काय झालं?

आव्हाडांनी पत्रात म्हटलं आहे, “महाराष्ट्र विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपणांस कळवण्यात येत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. या 9 सदस्यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्वरित सर्व सदस्यांची विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी आपणांस विनंती आहे.”

jitendra awhad wrote letter to rahul narvekar

ADVERTISEMENT

अजित पवार यांच्याकडे जास्त आमदार

2 जुलै रोजी अजित पवार आणि इतर आठ आमदार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी, 288 सदस्यांच्या विधानसभेत राष्ट्रवादीचे 53 आमदार होते. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या मुंबईत झालेल्या पहिल्या सभेला राष्ट्रवादीचे 35 आमदार आणि तर विधान परिषदेतील आठपैकी पाच आमदार उपस्थित होते.

ADVERTISEMENT

काका-पुतण्यामध्ये कुणाची ‘पॉवर’ जास्त

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या एकूण 53 आमदार आहेत. नव्या समीकरणानुसार आपल्याला 36 आमदारांचा पाठिंबा असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. मात्र, 14 आमदार शरद पवारांच्या बाजूने आहेत, तर काही आमदारांनी अजूनही त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. नियमानुसार पाहिले तर शरद पवार यांची स्थिती कमकुवत दिसत आहे.

वाचा >> पाय धरले अन्… शरद पवार-अजित पवार भेटीत नेमकं काय झालं? त्या 20 मिनिटांची Inside Story

शरद पवार आजही पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे याही त्यांच्यासोबत आहेत, तर अजित पवार यांच्यासोबत असलेले एक नेते कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आहेत. या स्थितीत शरद पवार यांची पक्षावर अधिक ताकद आहे. मात्र, पदाधिकारी आणि खासदार किती कोणासोबत आहेत, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसे, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अजित पवार गटात आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT