Johnson and Johnson ने किशोरवयीन मुलांच्या Vaccine Clinical Trial साठी CDSCO कडे मागितली संमती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जॉन्सन अँड जॉन्सने किशोर वयीन मुलांच्या लसीकरणासंदर्भात ट्रायल घेण्यासाठी CDSCO कडे संमती मागितली आहे. CDSCO अर्थात सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन याला संमती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना प्रतिबंधक लसीला भारतात आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात आणखी एक लस येणार आहे अशात आता याच कंपनीने किशोर वयीन मुलांच्या Vaccine Trial ची संमती मागितली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही भारतात आपात्कालीन वापराची संमती मिळालेली पहिली सिंगल डोस लस आहे. दोन दिवसांपूर्वी या कंपनीने मोदी सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लसी ८५ टक्के प्रभावी आहे असं कंपनीने म्हटलं आहे. एवढंच नाही तर अफ्रिका आणि ब्राझिल व्हेरिएंटवरही ही लस प्रभावी आहे असंही कंपनीने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT