Kacha Badam : ‘कच्चा बादाम’ फेम गायक भुबन कार अपघातात जखमी
‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला पश्चिम बंगालमधील गायक भुबन बड्याकर कार अपघातात जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. भुबन बड्याकर कार चालवायला शिकत आहे. त्याने अलिकडेच सेंकड हॅण्ड कार घेतली असून, ती चालवत असतानाच हा अपघात झाला. यात तो जबर जखमी झाला. छातीसह […]
ADVERTISEMENT
‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला पश्चिम बंगालमधील गायक भुबन बड्याकर कार अपघातात जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली.
ADVERTISEMENT
भुबन बड्याकर कार चालवायला शिकत आहे. त्याने अलिकडेच सेंकड हॅण्ड कार घेतली असून, ती चालवत असतानाच हा अपघात झाला. यात तो जबर जखमी झाला. छातीसह अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून, भुबनवर सध्या बीरभूम येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचलं का?
भुबन बड्याकर पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी गावात राहतो. पत्नी दोन मुलं आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. भुबन शेंगदाणे विकण्याचा गाडा चालवतात. यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेंगदाणे विकण्याचा व्यवसाय करत असतानाच भुबनने कच्चा बादाम गाणं तयार केलं आणि गायलं. जे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरलं.
ADVERTISEMENT
शेंगदाण्याचा गाडा चालवणारा भुबन अवघ्या काही दिवसांत देशात आणि परदेशात लोकप्रिय झाला. त्याला एका संगीत कंपनीने लाखो रुपये दिले आणि गाण्याचा व्हिडीओही प्रदर्शित केला आहे.
ADVERTISEMENT
आता भुबनला अनेक टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसह विविध ठिकाणी बोलवलं जात आहे. काही दिवसांपूर्वी ‘आजतक’शी बोलताना भुबनने शेंगदाणे विकणं बंद करणार असल्याचं सांगितलं होतं. आता आपण सेलिब्रेटी बनलो आहोत असं तो म्हणाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT