कैलासा वाद : जेव्हा ओशोंनी अमेरिकेत स्वतःचं शहर वसवून उडवून दिली होती खळबळ…
Spiritual guru Osho | Kailasa Controversy : स्वयंघोषित गुरू नित्यानंद यांच्या शिष्याचा एक व्हिडीओ अलिकडे चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने संयुक्त राष्ट्रांमधून बोलत असल्याचं सांगितलं होतं. शिष्य विजयप्रिया स्वतःला कैलासा नावाच्या काल्पनिक देशाची प्रतिनिधी म्हणून सांगत होती. युनायटेड नेशन्समध्ये विजयप्रिया यांनी दावा केला की कैलासात २० लाख स्थलांतरित हिंदू राहतात आणि कैलासाने १५० […]
ADVERTISEMENT
Spiritual guru Osho | Kailasa Controversy :
ADVERTISEMENT
स्वयंघोषित गुरू नित्यानंद यांच्या शिष्याचा एक व्हिडीओ अलिकडे चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने संयुक्त राष्ट्रांमधून बोलत असल्याचं सांगितलं होतं. शिष्य विजयप्रिया स्वतःला कैलासा नावाच्या काल्पनिक देशाची प्रतिनिधी म्हणून सांगत होती. युनायटेड नेशन्समध्ये विजयप्रिया यांनी दावा केला की कैलासात २० लाख स्थलांतरित हिंदू राहतात आणि कैलासाने १५० देशांमध्ये आपले दूतावास आणि एनजीओ उघडले आहेत. (When Osho created a stir by setting up his own city in America)
पण ऐकेकाळी नित्यानंदांच्या कैलासाप्रमाणेच भारतीय धर्मगुरू ओशो यांनीही अमेरिकेत त्यांच शहर वसवलं होतं. ओशोंच्या या अनोख्या प्रवासाची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया.
हे वाचलं का?
१९७० च्या दशकात ओशो भारतात खूप लोकप्रिय झाले होते. ते जितके लोकप्रिय होते तितकेच ते वादग्रस्तही होते. सेक्सबद्दलच्या त्याच्या मतांमुळे ते बरेच वादग्रस्त झाले होते. लोक त्यांना ‘सेक्स गुरू’ म्हणून संबोधायचे. १९७० मध्ये ओशोंनी मनालीमध्ये नवसंन्यासांना दीक्षा देण्यास सुरुवात केली. ते पारंपारिक संतांसारखे नव्हते. त्यांच्या प्रवचनात सेक्स आणि इतर गोष्टींचा उल्लेख असायचा. त्यांच्या शिष्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. १९७४ मध्ये ते शिष्यांसह पुण्यात आले.
रजनीश आश्रमाची स्थापना :
आश्रमाच्या सुरुवातीपासूनच ओशोंची कीर्ती जगभर पसरू लागली. पण भारतात त्याच्याबद्दलचा वाद खूप वाढला होता. या वादामुळे त्रासलेल्या ओशोंनी आपला आश्रम अशा शांत ठिकाणी बांधण्याचा विचार केला जिथे त्यांचे हजारो शिष्य आरामात राहू शकतील. यावर उपाय म्हणून ओशोंच्या प्रवक्त्या आणि स्वीय सचिव शीला बर्नस्टील, ज्यांना ‘मा आनंद शीला’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी १९८१ मध्ये अमेरिकेतील ओरेगॉन येथे पाणथळ जमीन खरेदी केली. ६४, ००० एकरच्या या भूखंडावर ओशोंनी आपल्या शिष्यांसाठी एक नवीन शहर वसवलं. ओशोंच्या या नव्या शहरात सुमारे पाच हजार शिष्यांचे वास्तव्य होते.
ADVERTISEMENT
Meghalaya : ‘मविआ’ पार्ट – २ सपशेल फसला; सर्वात मोठ्या पक्षासोबत काय घडलं?
ADVERTISEMENT
ओरेगॉनच्या आश्रमात प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य :
ओशोंचे शिष्य असलेले ब्रिटीश मानसशास्त्रज्ञ गॅरेट यांनी सांगितले की, सामान्य जीवनात जे काही करता येत नाही, त्या सर्व गोष्टींसाठी आश्रमात स्वातंत्र्य होते. गॅरेट यांनी सांगितले होते, ‘हे सगळं स्वप्नवत होतं. स्वातंत्र्य, लैंगिक स्वातंत्र्य, प्रेम आणि इतर अनेक गोष्टी होत्या. आम्हाला तिथं हवं ते करायला सांगितलं होतं. आम्ही गटागटाने एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, हसायचो, कधी नग्न असायचो.
या काळात ओशोंचे विलासी जीवन खूप वादग्रस्त ठरले. ओशोंची महागडी घड्याळे, रोल्स रॉयस कार, डिझायनर कपडे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. ओशोंच्या शिष्यांनी ओरेगॉनमधील आश्रमाची नोंदणी रजनीशपुरम नावाचे शहर म्हणून करण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक विरोधामुळे हे शक्य झाले नाही.
स्थानिक कायद्यांचे उल्लंघन :
ओशोंचे शिष्य ह्यू मिल यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की ओरेगॉन आश्रम सुरुवातीपासूनच स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करत होता. आश्रमातील काही शिष्य स्थानिक लोकांना त्रास देत असतं. इतकचं नाही तर सरकारी अधिकार्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ओशोंच्या शिष्यांवरही होता. स्थानिक प्रशासनाने निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ओशोंच्या आश्रमावर स्थानिक रेस्टॉरंटच्या जेवणात विष मिसळल्याचा आरोपही केला होता. ओशोंच्या आश्रमात शिष्यांसोबत अमानुष वागणूक दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
Rabri Devi: माजी सीएमच्या घरी सीबीआय पथक; ‘या’ घोटाळ्याप्रकरणी चौकशी
शिष्यांना आठवड्यातून ८० ते १०० तास आश्रमात काम करायला लावायचे, असे ह्यूंनी सांगितले होते. त्यामुळे शिष्य आजारी पडू लागले. पण आजारी शिष्यांवर उपचार करण्याऐवजी आश्रम त्यांना इंजेक्शन देऊन कामाला पाठवत असे. हळूहळू अमेरिकन सरकारने ओशोंवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर १९८५ मध्ये, अमेरिकेने ओशोंवर इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या 35 आरोप ठेवले. ओशोंना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर ४ लाख अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला.
त्यांना देश सोडण्याची आणि पाच वर्षे परत न येण्याची शिक्षा सुनावण्यात आली. १४ नोव्हेंबर १८८५ रोजी ओशो अमेरिका सोडून भारतात आले. भारतात आल्यानंतर ते नेपाळला गेले पण त्यानंतर १९८७ मध्ये ते पुण्यातील आश्रमात परतले. इथे त्यांनी पुन्हा हजारो शिष्यांना प्रवचन देण्यास सुरुवात केली. १९ जानेवारी १९९० रोजी ओशोंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT