‘तेव्हा हे दोघे उद्धव ठाकरेंची चाकरी करत होते’; ओमराजे निंबाळकर, कैलास पाटलांवर भाजपचा पलटवार
ठाकरे गटातील आमदार कैलास पाटील यांचं पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी बेदमुदत उपोषण सुरू आहे. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकरही ओला दुष्काळाच्या मागणीवरून आक्रमक झालेत. ठाकरे गटातील पाटील आणि निंबाळकर यांच्यावर भाजपकडून पलटवार करण्यात आलाय. आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पीक विम्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावरून भाजपनं ट्विट करत […]
ADVERTISEMENT
ठाकरे गटातील आमदार कैलास पाटील यांचं पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी बेदमुदत उपोषण सुरू आहे. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकरही ओला दुष्काळाच्या मागणीवरून आक्रमक झालेत. ठाकरे गटातील पाटील आणि निंबाळकर यांच्यावर भाजपकडून पलटवार करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पीक विम्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनावरून भाजपनं ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. ट्विटमध्ये म्हटलंय, “धाराशिव जिल्ह्यात सलग २ वर्षे (२०२०, २०२१) शेतकऱ्यांना पीक विमा नाकारणाऱ्या ठाकरे सरकार बद्दल ब्र शब्द न काढणारे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे नींबाळकर आणि आमदार कैलास पाटील आता आंदोलन करत आहेत.”
“२ वर्षे भाजपचे आमदार राणा जागजितसिंह पाटील यांनी पीक विमा मिळवण्यासाठी लढा दिला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुप्रीम कोर्टाकडून २०१ कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाला. सत्तांतर झाल्यानंतर शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या काळातील देखील पैसे मिळत आहेत. हे पाहून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना का मळमळ होत आहे ?”, असा उपरोधिक सवाल भाजपनं निंबाळकर आणि पाटील यांना भाजपनं केलाय.
हे वाचलं का?
“दोन वर्षे शेतकरी पीक विम्यासाठी भांडत होते, तेव्हा हे दोघे उद्धव ठाकरेंची चाकरी करत होते”, अशी टीकाही भाजपनं केलीये.
कैलास पाटील यांच्या उपोषणला हिंसक वळण; शहर बंदची हाक, बसेसही फोडल्या
आमदार कैलास पाटलांच्या आंदोलनाला भाजपचं पोस्टमधून उत्तर
पोस्टमध्ये म्हटलंय की, “उद्धव ठाकरेंनी नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या २०२० च्या पीक विम्यासाठी न्यायालयीन लढा देऊन ३,५७,२८७ शेतकऱ्यांच्या हक्काचा ५३१.४२ कोटी रुपये विमा मंजूर. (भरपाई रक्कम १८ हजार प्रती हेक्टरप्रमाणे)”
ADVERTISEMENT
“2022 मध्ये जुलै-ऑगस्ट मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई पोटी जिल्ह्यातील २,४८,८०१ शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासातील विक्रमी ४९४ कोटी रुपये अनुदान मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल ७१ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून प्रत्येकी ५० हजार रुपये सरकारकडून दिले आहेत”, असं भाजपनं ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला एकाच दिवसात तीन पातळ्यांवर यश
कैलास पाटील-एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून संवाद
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपोषणस्थळी जाऊन आमदार कैलास पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोन लावला व दोघांचे बोलणे करुन दिले. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटलांच्या उपोषणाची दखल घेत आश्वासन दिले.
धाराशिव जिल्ह्यात सलग २ वर्षे (२०२०, २०२१) शेतकऱ्याचं पीक विमा नाकारणाऱ्या ठाकरे सरकार बद्दल ब्र शब्द न काढणारे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे नींबाळकर आणि आमदार कैलास पाटील आता आंदोलन करत आहेत.
२ वर्षे भाजपचे आमदार राणा जागजितसिंह पाटील यांनी पीक विमा मिळवण्यासाठी लढा दिला.
१/३ pic.twitter.com/cuOaTzL2I5— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 29, 2022
282 कोटी रुपयाच्या निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिली. तर 2020 व 2021 च्या विम्याबाबत बैठक घेऊ. अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या नुकसानीच्या भरपाईचा निधी लवकरात लवकर मंजुर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचं आमदार कैलास पाटील यांनी फोनवरील संभाषणानंतर सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT