कल्याण: 26 किलोमीटरचा वळसा चुकवण्यासाठी नदीवरील तुटलेल्या साकवावरून जीवघेणा प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: दररोज कामावर जाणाऱ्या कामगारांना 26 किलोमीटरचा वळसा घालून जाणे परवडत नाही. यामुळे नदीतून जाणारा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर या रस्त्यावर लोखंडी पाईप टाकून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घालून नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे.

ADVERTISEMENT

कल्याण-टिटवाळा दरम्यान असलेल्या वसर हे गाव आहे. या गावाजवळून उल्हास नदीही वाहते. याठिकाणी एमआयडीसीचे पाणी उदंचन केंद्र असल्यामुळे एमआयडीसीने दोन गावांना जोडणारा चार फुट रुंदीचा रस्ता नदीतून तयार केला आहे. मात्र, पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरात रस्त्याचा काही भाग पाण्याच्या प्रवाहांबरोबर वाहून गेल्याने स्थानिक लोकप्रतिनिधीनी स्वखर्चाने या तुटलेल्या रस्त्यावर लोखंडी पाईप टाकून रस्ता जोडण्याचा प्रयत्न केला.

पण 10 इंचाच्या तीन लोखंडी पाईपावरून खालून धो-धो वाहणाऱ्या खोल नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहत नागरिकांना ये-जा करावी लागते. पलीकडील वसर गावापासून अंबरनाथ-बदलापूर हायवे अतिशय जवळ असल्यामुळे आणि रायते, टिटवाळासह दहागाव या जवळपास 12 ते 15 गावातून जवळपास 2 ते 3 हजार कामगार अंबरनाथ एमआयडीसीमधील कंपन्यामध्ये काम करत आल्याने या कामगारांना कंपनीत येण्या-जाण्यासाठी हा रस्ता स्वस्त आणि जवळचा पडतो.

हे वाचलं का?

यामुळे ऊन-पावसाची पर्वा न करता शेकडो कामगार जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये-जा करतात. या कामगारांना दुसरा मार्ग 26 किलोमीटरचा वळसा घालून गाठावा लागतो. यामुळे वेळ आणि खर्चाचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी दोन गावातील शेकडो नागरिक दररोज या पुलावरून ये-जा करतात.

अतिशय धोकादायक असलेल्या या रस्त्यावरून लहान मुले आणि महिलांना दुसरीकडे जाण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. दररोजची ही कसरत करताना नागरिक मात्र मेटाकुटीला आले असून तुटलेला हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. मात्र, एमआयडीसीकडून हा रस्ता स्वत:साठी तयार करण्यात आल्याचे कारण देत हा रस्ता दुरुस्त करत नसल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Video : अरे देवा… ऋषिकेशकडे जाणाऱ्या महामार्गावरील पूल वाहतूक सुरू असतानाच कोसळला!

ADVERTISEMENT

याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हा रस्ता धोकादायक असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाही. मात्र नागरिक जीव धोक्यात घालून या पुलावरून ये-जा करत आहेत. या नदीवर शासनाच्या माध्यमातून पूल किंवा रस्ता झाल्यास या गावाचा शहराशी थेट संपर्क होऊ शकेल. मात्र अस्तित्वातील रस्ता धोकादायक असल्याने तो नागरिकांनी वापरू नये असे आवाहन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT