कल्याण: पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी आत्महत्येचा बनाव, सराईत गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या
मिथिलेश गुप्ता, कल्याण: व्यापाऱ्यांना लूटून पाळणाऱ्या चोरट्याला दोन पोलिसांनी पाठलाग करुन पकडलं. लोकल ट्रेनमध्ये चढताना व्यापऱ्याचं पाकिट हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पाठलाग करुन पकडलं. चोराचा पाठलाग करुन पकडल्याची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. इरफान सय्यद असे या चोरट्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, पोलिसांनी त्याला पकडू नये यासाठी त्याने चाकूने स्वत:ला […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, कल्याण: व्यापाऱ्यांना लूटून पाळणाऱ्या चोरट्याला दोन पोलिसांनी पाठलाग करुन पकडलं. लोकल ट्रेनमध्ये चढताना व्यापऱ्याचं पाकिट हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पाठलाग करुन पकडलं. चोराचा पाठलाग करुन पकडल्याची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. इरफान सय्यद असे या चोरट्याचे नाव आहे.
ADVERTISEMENT
धक्कादायक म्हणजे, पोलिसांनी त्याला पकडू नये यासाठी त्याने चाकूने स्वत:ला जखमी करुन घेतलं होतं. पण पळून जाण्याची ही शक्कल पोलिसांसमोर काही एक कामी आली नाही.
उल्हासनगरमध्ये राहणारे व्यावसायिक दिलीप छुग हे काल (9 फेब्रुवारी) संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास कल्याण स्टेशनच्या फलाट क्रमांक दोनला आले. त्यांना उल्हासनगरला जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती. थोड्याच वेळातच कजर्त ट्रेन आली. या दरम्यान प्रवाशांची एकच झाली गर्दी होती.
हे वाचलं का?
याच गर्दीतून छुग हे ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्न करत होते. त्याचवेळी मागून एका चोरट्याने त्यांचं पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये बरेच पैसे होते. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पाकिट हिसकावून पळ काढला.
पण याचवेळी रेल्वे क्राईम ब्रांचच्या पोलिसांची नजर चोरट्यावर गेली. फलाटावर फिरत असताना रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस कर्मचारी कुणाल तायडे आणि कुणाल वालडे यांची इरफानवर नजर गेली.
ADVERTISEMENT
इरफानने व्यापारी दिलीप यांचं पाकिट हिसकावून पळ काढल्यानंतर. या दोन्ही पोलिसांनी लागलीच इरफानचा पाठलाग केला. थोडयाच अंतरावर दोन्ही पोलिसांनी इरफानला पकडलं. यावेळी इरफानने एक शक्कल लढविली. त्याने स्वत: जवळील असलेल्या चाकूने पहिले पोलिसांवर हल्ला करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही पोलिसांनी न घाबरता त्याचा पाठलाग सुरु ठेवला.
ADVERTISEMENT
कल्याण: आरोपींसह वकिलालाही अटक.. ते देखील कोर्ट परिसरातून, नेमकं प्रकरण काय?
पोलीस आपला पाठलाग करणं सोडत नाही हे पाहून त्याने स्वत:ला जखमी करुन आत्महत्येचा बनाव केला. मात्र, दोन्ही पोलिसांना या बनावला भीक न घालता इरफानच्या जागीच मुसक्या आवळल्या आणि त्याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने आतापर्यंत अनेक गंभीप गुन्हे केले असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, दोन्ही पोलिसांच्या कामगिरीचं सध्या कौतुक होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कल्याण जीआरपी पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT