कंगनाचा महाराष्ट्र सरकारवर पुन्हा निशाणा; सरकारचा ‘चंगू मंगू गँग’ म्हणून उल्लेख
नेहमी ट्विटरच्या माध्यमातून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा चर्चेत आलीये. तर कंगनाने पुन्हा. एकदा ट्विट करत महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कंगनाने महाराष्ट्र सरकारचा चंगू मंगू गँग असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊनच्या लावण्याच्या मुद्द्यावरून कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार […]
ADVERTISEMENT
नेहमी ट्विटरच्या माध्यमातून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा चर्चेत आलीये. तर कंगनाने पुन्हा. एकदा ट्विट करत महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कंगनाने महाराष्ट्र सरकारचा चंगू मंगू गँग असा उल्लेख केला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊनच्या लावण्याच्या मुद्द्यावरून कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार आहे का? की सेमी लॉकडाऊन आहे की फेक लॉकडाऊन? काय सुरु आहे इथे? कोणीच कडक निर्णय घेण्यासाठी इच्छित नाही. प्रत्येक क्षणी डोक्यावर टांगती तलवार लटकत असताना चंगू मंगू गँग आपल्या अस्तित्वासाठी लढतायत.”
Can anyone tell me if Maharashtra has a lockdown? Semi lockdown ? Fluid or fake lockdown? What is going on here? No one seems to be wanting to make decisive decisions. Changu Mangu gang fighting with existential crisis To be or not to be while every moment hanging like a sword.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 12, 2021
यापूर्वी देखील कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती पाहून मला आश्चर्य वाटतं, असं कंगनाने म्हटलं होतं. ती म्हणाली होती, “हे शहर सध्या जणू एखाद्या सांगाड्यासारखं दिसतंय. कधी काळी जे इतरांना स्वत:च्या दहशतीने घाबरवत होते ते आता स्वत: दहशतीखाली जगत आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची ही स्थिती पाहून मला आश्चर्य वाटतंय. जय मुंबा देवी.”
हे वाचलं का?
‘दहशत पसरवणारे आज स्वत: दहशतीखाली’; कंगनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा
तसंच काही दिवसांपूर्वी कंगनाने महाराष्ट्र सरकारवर टीका करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली होती. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विटरवरुन महाराष्ट्रात राष्ट्रपती लागू होईल का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने महाराष्ट्रात खरं तर राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी, असं ती म्हणाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT