परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाली…
अँटेलिया संशयित कार, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे अटक हे संपूर्ण प्रकरण आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवलंय. आज परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आलीये. तर या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंग यांच्या बदलीवरून कंगनाने शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. परमबीर यांच्या बदलीनंतर […]
ADVERTISEMENT
अँटेलिया संशयित कार, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे अटक हे संपूर्ण प्रकरण आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवलंय. आज परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आलीये. तर या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंग यांच्या बदलीवरून कंगनाने शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
परमबीर यांच्या बदलीनंतर कंगनाने ट्विटरद्वारे तिची प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली, “ही तेच व्यक्ती आहेत ज्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्याबद्दलच्या अपमानास्मद आर्टला प्रोत्साहित केलं होतं. जेव्हा मी त्याचा बदला घेतला त्यावेळी सोनियाच्या सेनेद्वारे त्यांचा बचाव केला गेला. तर त्या बदल्यात त्यांनी माझं घरंही तोडलं. आज बघा शिवसेनेने त्यांना बाहेर काढलं. ही तर शिवसेनेच्या शेवटाची सुरुवात आहे.”
हे वाचलं का?
मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं
यापूर्वीही प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित गाडीत सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी देखील कंगनाने ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘या प्रकरणात मोठ षडयंत्र रचलं आहे. योग्य पद्दतीने तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील तसंच शिवसेनेचं सरकार कोसळू शकतं असं कंगनाने म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांच्या तडकाफडकी बदलीनंतर संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…
ADVERTISEMENT
दरम्यान, याबाबत बदली बाबतची माहिती स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हे सचिन वाझे प्रकरणामुळे चर्चेत होते. अखेर आज त्यांची बदली गृहरक्षक दलामध्ये करण्यात आली. या सर्व प्रकरणावर कंगनाने प्रतिक्रिया देत शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT