Karuna Sharma यांना अखेर जामीन मंजूर, परळी, अंबाजोगाईत येण्यास मनाई
अखेर करुणा शर्मा आणि ड्रायव्हर अरुण मोरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झालीय.वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर (जामीन) आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांनचा जामीन मंजूर केला आहे.दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाईत येण्यास बंदी घालण्यात आली. बीडच्या परळीत प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या,करुणा शर्मा यांचा जामिनावर 20 […]
ADVERTISEMENT
अखेर करुणा शर्मा आणि ड्रायव्हर अरुण मोरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झालीय.वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर (जामीन) आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांनचा जामीन मंजूर केला आहे.दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाईत येण्यास बंदी घालण्यात आली.
ADVERTISEMENT
बीडच्या परळीत प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या,करुणा शर्मा यांचा जामिनावर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली न्यायाधिश एस.एस.सापटनेकर यांच्यासमोर दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला.करुणा शर्मा ह्या मागील पंधरा दिवसापासून बीडच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.आज त्यांचा १६ वा दिवस आहे.
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात 20 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असून निकाल राखीव ठेवण्यात आला होता.वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर (जामीन) आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांनचा जामीन मंजूर केला आहे.दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाईत येण्यास बंदी घालण्यात आली.हा निकाल आज न्यायाधीश एस एस सापटनेकर यांनी दुपारी दिलाय. दरम्यान करुणा शर्मा यांना १५ दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले असून या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
हे वाचलं का?
करूणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.
-बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळित आलेल्या आणि त्या नंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जमिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे. न्या. सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती.
ADVERTISEMENT
करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातीवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आऱोपावरून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT