Karuna Sharma यांना आजही दिलासा नाहीच, कोठडीतला मुक्काम आणखी वाढला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Karuna Sharma यांना कोर्टाकडून आजही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. करूणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. ही सुनावणी 20 सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी होणार आहे. त्यामुळे करूणा शर्मा यांचा कोठडीतला मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. करूणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

-बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळित आलेल्या आणि त्या नंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जमिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे. न्या. सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती.

करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातीवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आऱोपावरून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

हे वाचलं का?

त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतिने सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरण हे जानेवारी महिन्यात राज्यात चांगलंच गाजलं होतं. धनंजय मुंडे यांच्यावर एका मुलीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर करूणा शर्मा यांच्यासोबत असलेले आपले संबंध हे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मीडियावर मान्य करावे लागले होते. हे सगळं प्रकरण आता कोर्टात आहे, त्यामुळे याबाबत मीडियाने प्रसिद्धी देऊ नये या आशयाचं एक पत्रही धनंजय मुंडेंच्या वकिलांमार्फत मीडियाला पाठवण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

करुणा शर्मा यांना अटक झाल्यानंतर पोलीस जेव्हा घेऊन जात होते तेव्हा आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोपही करूणा शर्मा यांनी केला होता. आता या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 20 तारखेला होणार आहे. त्यामुळे करूणा शर्मा यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT