अहिल्याबाई होळकर ते मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट; काय आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काशी विश्वनाथ धाम हे आता नव्या रुपात दिसणार आहे. त्याचे फोटोही आता समोर आले आहेेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं आज (13 डिसेंबर) मोदींच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या काशी विश्वनाथांच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीनंतर तब्बल अडीचशे वर्षांनंतर हे बांधकाम होत आहे. राणी अहिल्याबाईंच्या योगदानाचे स्मरण करून श्री काशी विश्वनाथ धामच्या प्रांगणात त्यांचा पुतळा देखील बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच तिथल्या भिंतीवरही त्यांच्या योगदानाची नोंदही करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात विविध ठिकाणी अनेक मंदिरे, घाट बांधले, पण काशीच्या इतिहासात त्यांचे स्थान अमिट आहे. श्री विश्वनाथ धामचा इतिहास अहिल्यादेवी यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळेच अहिल्याबाईंचा पुतळा विश्वनाथ धाममध्ये बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतिहासात अशी नोंद आहे की, मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशावरून 1669 मध्ये काशीचं हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ज्यामध्ये मंदिराचे पूर्ण नुकसान झाले होते. पण त्यानंतर विश्वनाथ मंदिराच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीचे श्रेय होळकर घराण्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडेच जाते.

हे वाचलं का?

राणी अहिल्याबाईंनी काशीतील बाबा विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी तर करून घेतलीच, पण काशी विश्वनाथची प्राणप्रतिष्ठाही शास्त्रोक्त पद्धतीने केली होती.

ADVERTISEMENT

काशीचे प्राध्यापक राणा पीव्ही सिंह म्हणतात, ‘अहिल्याबाईंचे योगदान हे अतुलनीय आहे. अहिल्याबाईंनी शास्त्रसंगत पद्धतीने शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली हेती. यातून राणी अहिल्याबाईंची दूरदृष्टी आणि सनातन संस्कृतीवरील निष्ठा दिसून येते. विश्वनाथ मंदिर हे काशीपासून वेगळे झाल्यास काय उरेल? तर काहीही नाही. जेव्हा मंदिराचे नुकसान झाले तेव्हा राणी अहिल्याबाई अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने तेथे पोहोचल्या आणि पुन्हा मंदिर उभारलं.’

ADVERTISEMENT

महाराणी अहिल्याबाईंनी महादेवाचं मंदिर उभारुन महादेवाच्या भक्तांना सर्वात मोठी भेट दिली आहे.

आज त्याच बांधकामाच्या 250 वर्षांनंतर काशीधामची पुनर्बांधणी होत आहे. त्या काळातील इतिहासाची पाने पाहिली तर राणी अहिल्याबाईंचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. काशी विद्या परिषदेचे सरचिटणीस प्रोफेसर राम नारायण द्विवेदी सांगतात की, ‘आचार्य नारायण भट्ट यांच्या निर्देशानुसार 1777-1780 यांनी काशी विश्वेश्वराची प्राणप्रतिष्ठा केली. इतकेच नाही तर राणी अहिल्याबाईंचे काशीतील योगदान हे घाट बांधणीशी देखील निगडीत आहे.’

कोण होत्या राणी अहिल्याबाई होळकर?

राणी अहिल्याबाई होळकर (1725-1795) यांचा विवाह याच्या 8 व्या वर्षी होळकर साम्राज्याचे उत्तराधिकारी खंडेराव होळकर यांच्याशी झाला होता. 1754 मध्ये कुम्हारच्या लढाईत खंडेराव धारातीर्थी पडले. यानंतर धर्म पारायण अहिल्याबाईंनी स्वतःला हिंदू धर्म आणि इतर सर्जनशील कार्यांशी जोडून घेतलं.12 वर्षानंतर खंडेरावांचे वडील आणि राज्य व्यवस्थापक मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले.

यानंतर अहिल्याबाईंनी अत्यंत कुशलपणे आपल्या राज्याचा राज्यकारभार हाकला. एवढंच नव्हे तर आपले राज्य आक्रमकांपासून वाचवण्यासाठी युद्ध देखील केले. अहिल्याबाईंचे मुख्य योगदान म्हणजे देशभरातील मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि धार्मिक स्थळांचे बांधकाम. इतिहासात अहिल्याबाई होळकर यांचं नाव काशी विश्वेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी नोंदलं गेलं आहे.

‘अहिल्यादेवी होळकरांची तुलना ममता बॅनर्जींशी करणाऱ्या राऊतांनी तात्काळ माफी मागावी’, भाजप खासदाराचं CM ना पत्र

1669 मध्ये मंदिराचे नुकसान झाले होते. मुघल शासक औरंगजेबाचा आदेश या आक्रमणानंतर मंदिर पूर्णपणे उध्वस्त झालं होतं त्यामुळे अहिल्याबाईंनी फक्त मंदिराची उभारणी किंवा गर्भगृहच बांधलं नाही तर त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून काशी विश्वेश्वराची प्राणप्रतिष्ठा देखील केली. तेव्हापासून हे मंदिराशी राणी अहिल्याबाई होळकर यांचं नाव जोडलं गेलं आहे. दरम्यान, राजा रणजीत सिंह यांनी 1835 साली गर्भगृहाच्या शिखरावर सोन्याचा कळस चढवला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT