कौतिकराव ठालेपाटील यांच्याकडून फ्रान्सिस दिब्रेटो यांचा ख्रिस्ती लेखक असा उल्लेख, नव्या वादाला तोंड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज कौतिकराव ठालेपाटील यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी जयंत नारळीकर हे अनुपस्थित राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी मावळते संमलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांचा उल्लेख ख्रिस्ती लेखक असा केला. त्यामुळे आता संमेलनात नवा वाद निर्माण होणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. कौतिकराव ठाले पाटील हे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भाषणास सुरूवात केली त्यावेळी त्यांच्या बोलण्यात फ्रान्सिस दिब्रेटो यांचा उल्लेख त्यांनी ख्रिस्ती लेखक असा केला.

ADVERTISEMENT

काय म्हणाले कौतिकराव ठाले पाटील?

साहित्य महामंडळाने तीन वर्षांपूर्वी अध्यक्ष निवडीसाठी आपली घटना बदलली. घटना बदलल्यानंतर जे साहित्य संमेलन पार पडलं त्यात विघ्नं आली होती पण ती अध्यक्षांमुळे नव्हती आली. घटना बदलल्यानंतर दुसरं साहित्य संमेलन उस्मानाबाद आणि तिसरं नाशिकला पार पडतंय. साहित्य महामंडळाने जे अध्यक्ष निवडले त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहित्य संमेलनं अडचणीत आली होती हे मान्य केलं पाहिजे. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ ख्रिस्ती लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड साहित्य महामंडळाने केली होती. त्यांचे अनेक साहित्य संस्थांमध्ये अनेक सत्कारही झाले होते. सत्कार होईपर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती. साहित्य संमेलन दोन दिवसांवर आलं आणि त्यांच्या पाठीच्या कण्याच्या मणक्यांमध्ये अंतर पडलं. त्यामुळे त्यांना वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांनी त्यांना साहित्य संमेलनात जाण्यासाठी त्यांना मनाई करण्यात केली होती. तरीही ते उस्माबानाबाद या ठिकाणी सेकंड एसीच्या रेल्वेने पोहचले. या डब्यातून त्यांना उतरताही येत नव्हतं. त्यावेळी त्यांच्या या डब्यात असणाऱ्या आमदारांनी त्यांना व्हीलचेअरवर बसवलं, ट्रेनमधून उतरवलं आणि मग ते संमेलनाच्या ठिकाणी आले.

हे वाचलं का?

संमेलनाच्या ठिकाणी येऊन फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपले विचार मांडले. वेदना होत असूनही ते कार्यक्रमाचा खोळंबा नको, साहित्य महामंडळाने जो काही खर्च केला आहे तो त्यांनी लक्षात घेतला. त्या सगळ्याच्या जाणीवेतून ते आले होते. असं सांगत त्यांनी फ्रान्सिस दिब्रेटो यांचं उदाहरण दिलं. जयंत नारळीकर यांच्यावर टीका करायची नाही मात्र पुढच्या वेळी साहित्य महामंडळाने हिंडता फिरता माणूस संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडला पाहिजे असं म्हटलं आहे.

विश्वास पाटील काय म्हणाले?

ADVERTISEMENT

जयंत नारळीकर यांच्या प्रकृतीविषयी अडचण आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत ते कारण मान्य करता येण्यासारखं आहे. मात्र ठालेपाटील यांनी जो मुद्दा मांडला त्याच्य़ाशी मी सहमत आहे. हिंडता-फिरता माणूस अध्यक्ष असला पाहिजे असं मलाही वाटतं. तसंच तरूणाईला संधी दिली तरी काय हरकत आहे? असंही मत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

काय म्हणाले उत्तम कांबळे?

तरूण साहित्यिकांना संधी दिली पाहिजे याबाबत कुणाचं दुमत नाही. अध्यक्षपदाच्या वयाची चर्चा नाही. अध्यक्षपद हा एक सन्मान आहे. तो त्या व्यक्तीच्या ज्ञानाला, कर्तृत्वाला आणि सर्जनशीलतेला आहे. त्यामुळे इथे वयाचा संबंध कुठे आहे? तरूणांना संधी देणं म्हणजे हा त्याला आधार कार्ड मिळालं की संधी द्यायची का? माणसाचं योगदान काय आहे ते पण पाहिलंच पाहिजे असं उत्तम कांबळे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT