हे कोल्हापूर स्टाईलने केलेलं प्रपोज पाहिलं का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या धरणगुत्तीमध्ये एक अनोखं प्रेम प्रकरण समोर आलं. एका अज्ञात प्रेमविराने आपलं प्रेम प्रेयसीपर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क मध्यरात्री कोणालाही पत्ता लागू न देता, धरणगुत्ती – जयसिंगपूर रोडवर आय लव्ह यू, आय मिस यूचे संदेश लिहिले. ऑइल पेंटने तब्बल दोन मीटरपर्यंत हे संदेश लिहिलेले होते.

ADVERTISEMENT

या रोडवरून प्रवास करणा-यांनी हे संदेश पाहिल्यावर सगळीकडे त्याची चर्चा व्हायला लागली. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी ऑईल पेंटने पांढरा पट्टा मारुन हा मेसेज खोडून काढला. मात्र, हा संदेश लिहिणारा प्रेमवीर नेमका कोण याचा पत्ता अजून लागू शकलेला नाही. पण त्याच्या करामतीची अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चाच इतकी होतेय की त्याचा प्रयत्न सफल झालाय असं म्हणायला काही हरकत नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT