मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या लाहोरमधील घराजवळ बॉम्बस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कुख्यात दहशतवादी आणि मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या घराजवळ लाहोरमध्ये स्फोट झाला आहे. लाहोरच्या जौहर टाऊन भागात हा स्फोट झाला आहे. जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर सोळा जण जखमी झाला आहे. हा तोच भाग आहे जिथे दहशतवादी हाफिज सईदचं घर आहे. या ठिकाणी आता रेस्क्यू टीम पोहचली आहे. तर बॉम्ब निकामी करणारं पथकही पोहचलं आहे.

ADVERTISEMENT

हा बॉम्बस्फोट एवढा जबरदस्त होता की शेजारी असलेल्या इमारती आणि घरांच्या काचा फुटल्या. एका इमारतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या काही कार आणि वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जे या हल्ल्यात जखमी झाले आहेत त्यांना कार आणि रिक्षाच्या माध्यमातून जिन्ना रूग्णालयात उपचारांसाठी धाडण्यात आलं आहे असंही इथे आलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

या स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की तो दूरवर ऐकू गेला असंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. एका प्रत्यक्षदर्शीने जिओ न्यूजला सांगितलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीच्या घराजवळ एक मोटरसायक उभी होती तिथेच हा बॉम्बस्फोट झाला. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या ठिकाणी सुरू असलेले रस्ते बंद करण्यात आले असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तो भाग गर्दीने गजबजलेला असतो.

हाफिज सईद स्फोटाच्या वेळी घरात होता की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. तसंच यामागे मोठा कट असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

ADVERTISEMENT

कोण आहे हाफिज सईद?

ADVERTISEMENT

हाफिज सईद हा मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 160 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता.

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो सह संस्थापक आहे. तर जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना त्याने सुरू केली आहे.

जगातल्या कुख्यात दहशतवाद्यांपैकी हाफिज सईद हा एक आहे. भारताकडून गेल्या काही वर्षांपासून हाफिज सईदचा शोध घेतला जातो आहे. अमेरिकेने दहशतवाही हाफिज सईदवर सुमारे एक कोटी डॉलर्स बक्षीस ठेवलं आहे

भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज सईदच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT