विनायक शिंदेंना अटक झालेले लखन भैया एनकाऊंटर प्रकरण काय ?
मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर ठेवलेली स्कॉर्पिओ प्रकरणाच्या तपासात आता बरीच प्रगती झाली असून या प्रकरणाचा तपास करत असलेल्या NIA ने सचिन वाझे यांचा या साऱ्या प्रकरणातला सहभाग पुरेसा स्पष्ट केला आहे. याच प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास मात्र मुंबई पोलिसांची ATS शाखा करत आहे आणि त्यांनासुध्दा या प्रकरणातले महत्वाचे दुवे मिळाले आहेत. […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर ठेवलेली स्कॉर्पिओ प्रकरणाच्या तपासात आता बरीच प्रगती झाली असून या प्रकरणाचा तपास करत असलेल्या NIA ने सचिन वाझे यांचा या साऱ्या प्रकरणातला सहभाग पुरेसा स्पष्ट केला आहे.
ADVERTISEMENT
याच प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास मात्र मुंबई पोलिसांची ATS शाखा करत आहे आणि त्यांनासुध्दा या प्रकरणातले महत्वाचे दुवे मिळाले आहेत. या प्रकरणाचा तपास करताना ATS ने विनायक शिंदे या कॉन्स्टेबलसह नरेश धारे या बुकीला ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेले विनायक शिंदे हे तेच कॉन्स्टेबल आहेत ज्यांना लखन भैया एनकाऊंटर केसमध्ये 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
हे वाचलं का?
लखन भैया प्रकरण नेमक काय होतं?
राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा जवळचा सहकारी होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करायचा. प्रदीप शर्मा यांच्या टीमकडून लखन भैयाला ‘अनिल भेडा’ या व्यक्तीसोबत नवी मुंबईतल्या वाशी येथून उचलण्यात आले आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्य़ा वर्सोवा येथील नाना नानी पार्कमध्ये लखन भैय्याचे एनकाऊंटर करण्यात आले. हे एनकाऊंटर 2006 मध्ये करण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
लखन भैय्याच्या एनकाऊंटरनंतर चारच दिवसात लखन भैय्याच्या भावाने बॉम्बे हाय कोर्टात धाव घेतली आणि हे एनकाऊंटर नसून लखन भैय्याचा थंड डोक्याने खून करण्यात आला आहे असा आरोप केला.
या साऱ्या प्रकरणाची जेव्हा 2013 मध्ये चौकशी कऱण्यात आली तेव्हा असे आढळले की लखन भैय्या याच्यावर पॉईंट ब्लँक रेंजवरुन गोळी झाडण्यात आली आणि त्याचा खून करण्यात आलाय. एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे या पथकाचे प्रमुख होते. नंतर तत्कालीन मुंबई पोलीस कमिशनर अनामी रॉय यांनी माफी मागणारे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले होते. काही काळाने या साऱ्या प्रकरणातून प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता कऱण्यात आली होती.
या साऱ्या प्रकरणात 2013 मध्ये 21 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती त्यात 13 हे मुंबई पोलीस दलातले कर्मचारी होते.
डिसेंबर 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने या 11 जणांचे ऩिलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण पुन्हा एकदा मयत लखन भैयाच्या भावाने बॉम्बे हाय कोर्टात धाव घेतली आणि बॉम्बे हाय कोर्टाने राज्यसरकारचा हा निर्णय रद्दबातल ठरवला. देवेंद्र फडणवीस तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
ज्य़ा 11 पोलीस कर्मचाऱ्यांना लखन भैया प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती त्यात विनायक शिंदे यांचासुध्दा समावेश होता. मे 2020 मध्ये विनायक शिंदे पॅरोलवर तुरुंगातून सुटले होते आणि त्यानंतर याच विनायक शिंदेना मनसुख प्रकरणात एटीएसने ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT