माजी आमदार गणपतराव देशमुखांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान गणपतराव देशमुख यांचं सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत सांगोल्याच्या लाडक्या बाबांना आज अंतिम निरोप देण्यात आला. गणपतराव देशमुखांवर प्रेम […]
ADVERTISEMENT
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान गणपतराव देशमुख यांचं सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत सांगोल्याच्या लाडक्या बाबांना आज अंतिम निरोप देण्यात आला. गणपतराव देशमुखांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध यावेळी फुटला. आबासाहेब अमर रहे च्या घोषणांनानी परिसर दुमदुमून गेला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता.
ADVERTISEMENT
अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५५ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गणपतरावांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
Ganpatrao Deshmukh यांचं निधन, शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ADVERTISEMENT