यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अडचणी वाढल्या! पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला भेटायची, नंतर केलं असं काही..
Jyoti Malhotra Latest News : देशाविरोधात पाकिस्तानमध्ये हेरगिरी करण्याच्या प्रकरणात यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ज्योती मल्होत्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्यासोबत होतं कनेक्शन

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर
Jyoti Malhotra Latest News : देशाविरोधात पाकिस्तानमध्ये हेरगिरी करण्याच्या प्रकरणात यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. ज्योतीची न्यायालयीन कोठडी 23 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तत्पूर्वी ज्योतीच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानचा रिटायर्ड पोलीस सब-इन्स्पेक्टर नासिर ढल्लोशी ज्योतीचं कनेक्शन असल्याचं उघडकीस आला आहे. त्यामुळे ज्योतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ज्योती मल्होत्राला हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता ज्योतीची न्यायालयीन कोठडी आणखी 14 दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 23 जून 2025 रोजी होणार आहे. तपास एजन्सींचा दाव आहे की, ज्योतीचं कनेक्शन पाकिस्तानशी जोडलेलं आहे. त्यामुळे याप्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
हे ही वाचा >> राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण? सोनमने घरच्या नोकराला पटवलं अन्...खळबळजनक माहिती समोर!
पाकिस्तानच्या रिडायर्ड सब-इन्स्पेक्टरसोबत कनेक्शन
तपासादरम्यान अशी माहिती समोर आलीय की, ज्योती मल्होत्रा पाकिस्तान पोलिसांचा रिटायर्ड सब-इन्स्पेक्टर नासिर ढिल्लोच्या संपर्कात होती. नासिर जो आता एक युट्यूब चॅनल चालवतो, त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तो ISI आणि पाकिस्तानच्या सैनिकांच्या आदेशावर काम करून भारतीय यूट्यूबर्सशी मैत्री करायचा. तो या यूट्यूबर्सला ISI एजंट्ससोबत भेट करून द्यायचा.
भारतीय आर्मीची गुपित माहिती मिळवण्यासाठी तो हेरचा वापर करायचा.ज्योतीने नासिरसोबत एक पॉडकास्ट केलं होतं. ही मुलाखत पाकिस्तानमध्ये झाली होती. एका अन्य पॉडकास्टरने नासिर ISI एजंट असल्याचा आरोप केला होता. यावर त्याने हसत हसत नकारात्मक प्रतिसाद दिला होता. दरम्यान, तपास एजन्सींना नासिर आणि ज्योतीच्या कनेक्शनबाबत पक्के पुरावे सापडले आहेत.