राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण? सोनमने घरच्या नोकराला पटवलं अन्...खळबळजनक माहिती समोर!

मुंबई तक

Raja And Sonam Honeymoon Case Latest Update : इंदौरचे नवविवाहित कपल राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

ADVERTISEMENT

Raja And Sonam Honeymoon Case Update
Raja And Sonam Honeymoon Case Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजा आणि सोनम हनिमून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

point

राज्याच्या हत्येचा मास्टरामाईंड कोण? का केली हत्या?

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Raja And Sonam Honeymoon Case Latest Update : इंदौरचे नवविवाहित कपल राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, सोनम रघुवंशीने त्याचा प्रियकर राज कुशवाह आणि सुपारी किलर्ससोबत मिळून राजाची हत्या केली. सोनमचं राजसोबत लग्नाआधीपासून अफेअर होतं. तोच या हत्याकांडचा मास्टराईंड आहे.

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केल्यानंतर समोर आलं की, सोनमच्या वडिलांची इंदौरमध्ये एक छोटी प्लायवूड फॅक्टरी आहे. जिथे राज कुशवाह काम करत होता.सोनम नेहमीच फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये यायची. त्याचदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. राज कुशवाह सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. या प्रेम प्रकरणामुळे सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला. 

हे ही वाचा >> ढाब्यावर पोलिसांनी आवळल्या सोनमच्या मुसक्या! पती राजाची हत्या का केली? समोर आली मोठी अपडेट

लग्नसोहळा थाटामाटात पार पडला पण नऊ दिवसानंतर घडलं..

इंदौरचा राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न 11 मे रोजी थाटामाटात पार पडलं होतं. लग्नाच्या नऊ दिवसानंतर 20 मे रोजी हे कपल हनिमूनसाठी मेघालयसाठी रवाना झालं. 22 मे रोजी ते भाड्याच्या स्कूटरने मावलखियाट गावात पोहोचले. त्यानंतर ते नोंग्नियाट गावात लिविंग रुट्स पूल पाहण्यासाठी गेले. त्ये नोंग्नियाटच्या शिपारा येथे राहिले.

त्यानंतर 24 मे रोजी सकाळी चेकआऊट केलं. त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांची स्कूटर शिलाँग-सोहरा मार्गावर एक कॅफेच्या बाहेर सापडलं. 2 जून रोजी वेईसावडॉन्ग धबधब्याजवळ खोल दरीत राजाचा मृतदेह आढळला. त्यानंतर आज 9 जून रोजी सोनम पोलिसांना गाजीपूरमध्ये सापडली.

हे ही वाचा >> लोणावळ्यात तरुणांनी भुशी डॅमचं कुंपण ओलांडलं, धपा धप मारल्या उड्या अन् नंतर गटांगळ्या खात...

शिलाँग पोलीस सोनमला ट्रांजिट रिमांडवर घेण्यासाठी गाजीपूरला जाणार आहेत. पोलिसा आता या हत्याप्रकरणी अन्य संशयित आरोपींचा कसून तपास करत आहेत. याप्रकरणी चौथा आरोपी आनंदला अटक करण्यात आली आहे. तर सोनमला गाजीपूर येथून अटक केली आहे. अन्य आरोपींना इंदौर येथून अटक करण्यात आलीय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp