"तो माझ्या समोरच आहे..." सहा महिने पोलिसांना गुंगारा, बलात्कारातला आरोपी कसा सापडला? खबऱ्याने...
तिसरा आरोपी सूरज गोसावी हा गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. त्याने आपला मोबाइल फोन बंद ठेवला होता आणि पत्नी, कुटुंब किंवा मित्रांशी संपर्क साधला नव्हता.
ADVERTISEMENT

Pune : पुण्यातील बोपदेव घाटात 3 ऑक्टोबर 2024 रोजी घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी सूरज दशरथ गोसावी उर्फ बाप्या (वय ३३) याला सहा महिन्यांच्या शोधानंतर अखेर 26 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील बसस्थानकावरून अटक करण्यात आली. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वालचंदनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील पीडित 21 वर्षीय तरुणी आणि तिचा मित्र, दोघेही पुण्याबाहेरील महाविद्यालयीन विद्यार्थी, 3 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाट परिसरात मोटरसायकलवरून फिरत होते. त्यावेळी तीन आरोपींनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटल्या.
हे ही वाचा >> राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण? सोनमने घरच्या नोकराला पटवलं अन्...खळबळजनक माहिती समोर!
यानंतर, त्यांनी तरुणीच्या मित्राला त्याच्या शर्ट आणि बेल्टने बांधून तिला एका निर्जन ठिकाणी ओढत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, या घटनेने संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली होती. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना काही दिवसांतच अटक केली. चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, मूळ दिंदोरी, मध्य प्रदेश) याला 10 ऑक्टोबर रोजी आणि अख्तर बाबू शेख उर्फ शोएब (वय 27) याला 14 ऑक्टोबर रोजी प्रयागराज येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी शेख हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले होते.
मात्र, तिसरा आरोपी सूरज गोसावी हा गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. त्याने आपला मोबाइल फोन बंद ठेवला होता आणि पत्नी, कुटुंब किंवा मित्रांशी संपर्क साधला नव्हता. पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अनेक पथकांनी त्याचा शोध घेतला. सुरुवातीला अटक केलेल्या दोन आरोपींनी गोसावीचx नाव सोमनाथ यादव असं खोटं सांगून तपासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पडताळणीनंतर त्याचं खरं नाव सूरज दशरथ गोसावी उर्फ बाप्या असल्याचं कळलं केले.









