ग्राहकांनो..टेन्शन घेऊच नका! आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, 24 कॅरेटचे दर वाचून खुश व्हाल
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलं. अशातच आज गुंतवणूकदार आणि ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. कारण मागील आठवड्याच्या तुलनेत आज 9 जून 2025 रोजी सोन्याचे दर 1600 रुपयांनी घसरले आहेत.
राजधानी दिल्लीसह मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89700 रुपये झाले आहेत. चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आज चांदीचे दर 200 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे दर 1,06,900 रुपयांवर पोहोचले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.









