स्वर्गीय स्वर विसावला! लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गेली आठ दशकांपासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारा स्वर्गीय सूर आज कायमचा विसावला. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. आज सायंकाळी सात वाजून – – मिनिटांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, अभिनेता शाहरूख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर […]
ADVERTISEMENT
गेली आठ दशकांपासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणारा स्वर्गीय सूर आज कायमचा विसावला. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. आज सायंकाळी सात वाजून – – मिनिटांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, अभिनेता शाहरूख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्षचक्र अर्पण करून लतादीदींचं अंतिम दर्शन घेतलं.
ADVERTISEMENT
हजारो गाण्यांना स्वरांचा साज चढवत अजरामर करणाऱ्या गान कोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं. आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांचं पार्थिव प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार्थिव आणण्यात आलं.
Blog : कहीं ये ‘वो’तो नहीं….
हे वाचलं का?
शिवाजी पार्क येथे पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधींसह अंत्यसंस्कार कऱण्यात आले. त्यांचे बंधू ह्रद्यनाथ मंगेशकर यांनी लता मंगेशकरांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण… ‘ दीदींच्या निधनानंतर ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
ADVERTISEMENT
शिवाजी पार्क येथे अखेरचं दर्शन घेण्यासाठी लता मंगेशकरांच्या चाहत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. लता मंगेशकर यांचं दर्शन घेण्यासाठी आणि अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता शाहरुख खान, गुलजार यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती.
ADVERTISEMENT
लता मंगेशकरांनी संपूर्ण कारकीर्दीत 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. 13 वर्षाच्या असतानाच त्यांनी मराठी चित्रपट ‘किती हसाल’साठी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. चित्रपट प्रदर्शित झाला पण नेमकं लता मंगेशकरांनी गायलेलं गाणच चित्रपटातून वगळण्यात आलं. या घटनेमुळे लता मंगेशकर दुःखी झाल्या. त्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचं छत्र हरवलं.
1945 साली लता मंगेशकर मुंबईत आल्या. मुंबईत आल्यानंतर अमानत अली खान यांच्याकडून त्यांनी पुन्हा संगीताची साधना सुरू केली. 1947 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट ‘आप की सेवा मे’मध्ये पहिलं हिंदी गाणं गायलं. पहिल्या गाण्याने अपेक्षेइतकी प्रसिद्धी मिळवून दिली नाही. नंतर 1949 साली त्यांनी लागोपाठ बरसात, दुलारी, अंदाज व महल या 4 हिट चित्रपटांची गाणी गायली. त्यामुळे त्यांचा आवाज सिनेरसिकांपर्यंत पोहोचला. महल चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं सिनेरसिकांना प्रचंड भावलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT