गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिलं उत्तर, म्हणाले…..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गानसम्राज्ञी लात मंगेशकर यांना लवकर बरं वाटावं म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. 8 जानेवारीला त्यांना निमोनियाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईतल्या ब्रीचकँडी या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोरोनाची काही लक्षणं जाणवली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मात्र त्यांचं वय 92 असल्याने त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीत काळजीचा भाग म्हणून ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

आता कशी आहे लता मंगेशकर यांची प्रकृती?

हे वाचलं का?

ब्रीच कँडी रूग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ANI ला हे सांगितलं आहे की, ‘लता मंगेशकर यांच्यावर अजूनही आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत. आम्ही कसोशीचे प्रयत्न करून त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यांचीच ही इच्छा आहे की लता मंगेशकर यांना लवकर बरं वाटलं पाहिजे. अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते आहे.’ डॉ. प्रतीत समदानी यांनी हेदेखील सांगितली की लता मंगेशकर यांना असं वाटतं की त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती किंवा त्याविषयीची चर्चा फार होऊ नये.

लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया असे दोन्ही आजार झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लतादीदींच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे की लतादीदींना कोरोनाची लक्षणं सौम्य प्रमाणात आहेत मात्र त्यांचं वय लक्षात घेता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांनी शेकडो चित्रपटांसाठी हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाची जादू ही प्रत्येक पिढीला आपलंसं करणारी ठरली आहे. लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार हे अत्यंत मानाचे समजले जाणारे पुरस्कार मिळाले आहेत. तसंच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. लता मंगेशकर यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही समाविष्ट करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

2019 मध्ये 28 दिवस रूग्णालयात होत्या लतादीदी

2019 मध्येही लतादीदींना निमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल 28 दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता यावेळी लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT