रितेश-जिनिलियाची कंपनी भूखंड प्रकरणामुळे गोत्यात? भाजपकडून गंभीर आरोपांच्या फैरी

मुंबई तक

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची जिनिलिया देशमुख हे दोघंही महाराष्ट्रातलं लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. या दोघांची लातूरमधली कंपनी भूखंड प्रकरणामुळे वादात सापडली आहे. अभिनेता रितेश देमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया या दोघांवर आता भाजपने आरोप केले आहे. या दोघांच्या कंपनीसाठी १० दिवसात भूखंड मंजूर करण्यात आला आणि देश अॅग्रो प्रा. लिमिटेडला महिन्यभरात १२० कोटी रूपयांचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची जिनिलिया देशमुख हे दोघंही महाराष्ट्रातलं लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. या दोघांची लातूरमधली कंपनी भूखंड प्रकरणामुळे वादात सापडली आहे. अभिनेता रितेश देमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया या दोघांवर आता भाजपने आरोप केले आहे. या दोघांच्या कंपनीसाठी १० दिवसात भूखंड मंजूर करण्यात आला आणि देश अॅग्रो प्रा. लिमिटेडला महिन्यभरात १२० कोटी रूपयांचं कर्जही मंजूर करण्यात आलं असा आरोप भाजपने केला आहे.

भाजपने नेमका काय आरोप केला आहे?

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी राजकीय दबाव आणून एमआयडीसी कडून भूखंड घेतल्याचा आरोप भाजपने

केला आहे.रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे लातूरच्या नवीन एमआयडीसी मध्ये देश ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड नावाने कारखाना उभा करत आहेत. वेटिंग मध्ये अनेक लोक प्रलंबित असताना कारखान्यासाठी midc ने केवळ 15 दिवसात देश अग्रोला भूखंड दिलाच कसा असा सवाल भाजपाने केला आहे.

आणखी काय म्हटलं आहे भाजपने?

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १२० कोटींच्या कर्जाचा पुरवठा नेमका कुठल्या निकषांवर केला? कर्ज मंजूर करताना एवढी तत्परता कशी दाखवली असाही प्रश्न विचारण्यात आला आहे. या कंपनीबाबत लातूर बँकेने आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी भाजपने पत्रकार परिषद घेऊन सदर प्रकरणी तपास करावा अशी मागणी केली आहे.

काय आहे रितेश जिनिलियाच्या देश अॅग्रो कंपनीबाबतची माहिती

कंपनीचं नाव-देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीची स्थापना- २३ मार्च २०२१

कंपनीचे भागीदार- रितेश विलासराव देशमुख, जिनिलिया रितेश देशमुख यांची अर्धी अर्धी भागिदारी

कंपनीचं भाग भांडवल- ७.३० कोटी

कंपनीची जागा मिळण्यासाठी रितेश देशमुखांना झुकतं माप- दहा दिवसात रितेश आणि जिनिलिया या दोघांना भूखंड उपलब्ध करून देण्यात आला. या जागेसाठी १६ जणांचे अर्ज प्रलंबित होते

संभाजी पाटील निलंगेकर यांनी या प्रकरणात काय म्हटलं आहे?

लातूर येथील सहकारी बँक ही एखाद्या कुटुंबाच्या मालकीची असल्याप्रमाणे हा सगळा व्यवहार सुरू आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना पाच लाख रूपये देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मात्र एवढं मोठं कर्ज या बँकेने रितेश-जेनिलियाला कसं दिलं? असाही प्रश्न भाजपने विचारला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp