Little Things 4 trailer: ध्रुव आणि काव्या करणार लग्न?; ‘लिटल थिंग्स-4’ ट्रेलर झाला प्रदर्शित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनोरंजनाच्या डिजिटल दुनियेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ध्रुव आणि काव्या अर्थात अभिनेत्री मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल पुन्हा एकदा लिटल थिग्समधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘लिटल थिग्स’च्या चौथ्या सीझनची प्रतिक्षा लवकरच संपणार असून, चौथ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अखेरच्या सीझनमध्ये ध्रुव आणि काव्या लग्न करणार असल्याचं दिसत आहे.

ADVERTISEMENT

ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय ठरलेल्या लिटल थिग्स चौथा आणि अखेरचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. चौथ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चौथ्या सीझनमध्येही ध्रुव व काव्यामधील रोमांन्स, भांडण आणि रिलेशनशिपमधील चढउतार बघायला मिळणार आहेत.

यापूर्वी आलेले तिन्ही सीझन लोकप्रिय ठरले. ध्रुव आणि काव्याची जोडी चाहत्यांच्या पसंती पडली. पहिला सीझन युट्यूबवर रिलीज करण्यात आला होता. लिटल थिग्स वेबसीरिजमुळे अभिनेत्री मिथिला पालकर आणि ध्रुव सेहगल खूप लोकप्रिय झाले.

हे वाचलं का?

लिटल थिग्सला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील सीझनचे कॉपी राईट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले होते. आता चौथा सीझनही प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर बघायला मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT