Monsoon in Mumbai : पहिल्याच फटक्यात Mumbai Local ला ब्रेक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत मान्सूनचं आगमन झालं की त्याचा पहिला फटका बसतो तो मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकल सेवेला. आज मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आणि या पावसाचा पहिलाच फटका लोकल सेवेला बसला आहे. सेंट्रल रेल्वे मार्गावर कुर्ला ते सीएसएमटी मार्गावरची लोकल सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. यानंतर पावसाचा जोर पाहता ही सेवा ठाणे ते सीएसएमटी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरही पावसाचा फटका लोकल सेवेला बसला आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ पाणी भरल्यामुळे १० वाजून २० मिनीटांनी सीएसएमटी ते वाशी मार्गावरची सेवा बंद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या पावसाचा कोणताही फटका बसलेला नसून ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवाही सुरळीत सुरु असल्याचं कळतंय. ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा, वाशी-पनवेल मार्गावरील सेवा सुरळीत सुरु असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

Monsoon in Mumbai : शहरात पावसाची जोरदार बॅटींग, सखल भागात पाणी साचलं

हे वाचलं का?

मुंबईत ११ जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात पुढचे ४ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली.

मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून शहर आणि उपनगर भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मुंबईच्या ई वॉर्डात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात आतापर्यंत ४८.९९ एम.एम. , पूर्व उपनगरात ६६.९९ एम. एम. तर पश्चिम उपनगरात ४८.७८ एम.एम. पावसाची नोंद झाली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच आभाळ दाटून आलेलं पहायला मिळालं. सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून शनिवारी रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहचल्याची हवामान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेनेही हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन शहरात पावसामुळे पाणी साचणार नाही तसेच कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली आहे.

ADVERTISEMENT

तरीही आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सायन परिसरात रस्त्यावर पाणी साचलेलं पहायला मिळालं. दादर-हिंदमाता, परळ, सायन या ठरलेल्या ठिकाणी मुंबईत पावसात नेहमी पाणी साचलेलं पहायला मिळतं. पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की रस्त्यावरील मॅनहोलची झाकणंही त्यामुळे निघाली. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नाशिक आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT