उद्धव ठाकरे म्हणतात, लॉकडाउनचा पर्याय आहे पण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. नवीन वर्षात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झालेली असली तरीही वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन लावावं लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदूरबारमधील मोलगी धडगाव या उपकेंद्रावर भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत लस घेताना काही समस्या तर येत नाहीयेत ना याचीही मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली.

ADVERTISEMENT

Corona रुग्ण वाढूनही नागपुरात लॉकडाऊनचा फज्जा, रस्त्यांवर नागरिकांची गर्दी

“राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता आलेली आहे. लॉकडाउन हा पर्याय आहेच, पण महाराष्ट्रातली जनतेने त्या काळात मला जसं सहकार्य केलं तसंच सहाकार्य आताही मिळेल अशी आशा आहे, आणि जनता मला सहकार्य करेल याची मला खात्री आहे. गेल्या वर्षात देशात आणि राज्यात कोरोनाने शिरकाव केला तेव्हा आपल्या हातात काहीही नव्हतं. परंतु सुदैवाने आता आपल्या हातात लस आली आहे. या लसीचा ढालीसारखा वापर करुन घ्यायला हवा. कोणतीही भीती मनात न बाळगता सर्वांनी लस घ्यावी. याचसोबत बाहेर पडत असताना मास्कचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.” लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.

हे वाचलं का?

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान काही दिवसांपूर्वी देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्याला लस कमी पडणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. येणाऱ्या काळात लसीचा पुरवठा योग्य वेळेत होईल. यावेळी हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रात लस निर्मिती करण्याची परवानगी राज्याने केंद्राकडे मागितली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार यावर काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

मुंबईकरांनो Mall मध्ये जाण्याचा प्लान करताय? मग ही बातमी वाचाच !

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT