केंद्रामुळे नमामी गंगेचं शवामी गंगेत रुपांतर – खासदार धानोरकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशभरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी गंगा नदीत कोरोनामुळे निधन झालेल्यांचे मृतदेह तरंगत आल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. काँग्रेसने याच प्रकरणात केंद्रावर टीका केली आहे. केंद्रामुळे नमामी गंगेचं रुपांत शवामी गंगेत झाल्याची टीका चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

२०१४ साली पंतप्रधान मोदी यांनी नमामी गंगे या नावाने एका राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा केली होती. या गंगा नदीवर ४० टक्के लोकांचं रोजचं जीवन अवलंबून आहे. ७ वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही केंद्राच्या नियोजनशून्य कारभारामुळे गंगेचं रुपांतर शवामी गंगे असं झाल्याची टीका धानोरकर यांनी केली आहे. जगभरात गंगा नदीची ओळख ही पवित्र नदी म्हणून आहे. याच नदीच्या पात्रात शेकडो मृतदेह वाहत आल्यामुळे हा संपूर्ण भारतीयांचा अपमान असल्याचंही धानोरकर म्हणाले आहेत.

निवडून आल्यानंतर प्रदूषित गंगा नदी आपण स्वच्छ करू असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामी गंगे असा कार्यक्रम राबविला. २०१५ मध्ये भाजप सरकारने या नदीच्या पंचवार्षिक स्वच्छता योजनेसाठी २० हजार कोटी रुपये देण्याच्या आश्वासन दिले होते. मोदींचा वाराणसी मतदारसंघात गंगेच्या तीरावरील एक महत्वाचं यात्रास्थळ आहे. तिथे देखील अशीच विदारक परिस्थिती आहे. गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झाशी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जातोय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकारामुळे जगात देशाचे नाव चुकीच्या पद्धतीने जात आहे. कोरोनाच्या उपायोजना करण्याकरिता विरोधी पक्षाच्या सूचना देखील विचारात घ्याव्यात. कोरोनाची लढाई ही फक्त भाजपाची नसून सर्वांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वाना सोबत घेऊन निर्णय घ्यावे अशी विनंती महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT