राज ठाकरे बनले ‘हिंदुओका राजा’, उत्तरसभेआधी ‘या’ बॅनरची तुफान चर्चा
विक्रांत चव्हाण, प्रतिनिधी, ठाणे मनसेची उत्तरसभा आज (12 एप्रिल) संध्याकाळी म्हणजेच ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथल्या डॉ. मूस रोडवर होणार आहे. त्याआधी झळकलेल्या या बॅनरमधून मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नाही तर आजच्या सभेआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘हिंदूओका राजा’ अशी एक नवीन उपाधी देण्यात आली आहे. गुडी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी ‘स्वतःची […]
ADVERTISEMENT
विक्रांत चव्हाण, प्रतिनिधी, ठाणे
ADVERTISEMENT
मनसेची उत्तरसभा आज (12 एप्रिल) संध्याकाळी म्हणजेच ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथल्या डॉ. मूस रोडवर होणार आहे. त्याआधी झळकलेल्या या बॅनरमधून मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. इतकंच नाही तर आजच्या सभेआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘हिंदूओका राजा’ अशी एक नवीन उपाधी देण्यात आली आहे.
गुडी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी ‘स्वतःची ओळख हिंदूधर्माभिमानी’असल्याचं सांगत आपण जातीपातीवरुन भांडतो, जातीतून बाहेर कधी येणार आणि आपण हिंदू म्हणून कधी एक होणार? असे सवाल केले होते. तसंच मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मशिदींसमोर दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचा कार्यक्रम मनसैनिकांना दिला होता.
हे वाचलं का?
तेव्हापासून मनसेचं पुढचं राजकारण हे हिंदूत्त्वावर आधारीतच असेल असं पुन्हा स्पष्ट झालं होतं. आज ठाण्यात होणाऱ्या या उत्तर सभेत राज ठाकरे कशावर उत्तर देणार याची उत्सुकता असताना आता हिंदी भाषेत समोर आलेल्या या बॅनरमध्ये ‘हिंदूओका राजा’असा उल्लेख राज ठाकरेंसाठी करण्यात आला आहे. मनसेचे ठाण्यातले विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी हा बॅनर लावला आहे.
पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्त्वाचे वारसदार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगण्यात आलं. पण मेख ही होती ती या हिंदूंचा नेता म्हणवणाऱ्या नेत्याला उपाधी कोणती द्यायची यायची? कारण, याआधी घाटकोपर आणि चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनर वर हिंदूहृदयसम्राट असा केलेल्या उल्लेखानंतर पक्षानेच राज ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट म्हणू नये असं खडसावलं होतं.
ADVERTISEMENT
‘महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या मराठी हृदयसम्राट उपाधी व्यतिरिक्त इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. तसेच या सूचनेचं तंतोतंत पालन व्हावं’, असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. त्यानुसार ‘मराठी हृदयसम्राट’याव्यतिरिक्त कोणतीही उपाधी वापरु नये असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला होता.
ADVERTISEMENT
‘उत्तर सभे’त राज ठाकरे या सहा आरोपांना ‘करारा जवाब’ देणार का?
आता अशा पद्धतीने ‘हिंदूओका राजा’ या उपाधीचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्वीकार होतो का आणि ते यावर काय बोलतात याचं ‘उत्तरही’ उत्तर सभेत मिळेल अशी अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT