महाबळेश्वर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, १३ जणांवर POSCO अंतर्गत गुन्हा

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी लहान बाळाला जन्म दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. तपासाअंती या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींसह १३ जणांवर POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते डी.एम.बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

आतापर्यंत या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे, संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे, प्रभाकर हिरवे यांना अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथकं रवाना केली आहेत.

धक्कादायक, डोंबिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार

हे वाचलं का?

पीडित मुलगी महाबळेश्वरमध्ये मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवते. मुख्य आरोपी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार करत केले, ज्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी या मुलीची प्रसुती करण्यात आली ज्यावेळी तिने एका लहान मुलीला जन्म दिला. हा प्रकार घडल्यानंतर नवजात मुलीला मुंबईतील चौरसिया कुटुंबाकडे सोपवण्यात आलं. या कुटुंबाला नवजात मुलगी सोपवण्यात शिवसेना नेते बावळेकर यांच्या दोन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आल्यामुळे त्यांच्यावरही मुलीवर झालेला अत्याचार आणि आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक संबंधांमधून या मुलीचा जन्म झाल्यामुळे आरोपींनी मुंबईतील चौरसिया कुटुंबाला ही मुलगी सोपवण्याचं ठरवलं. या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही याची काळजी आरोपींनी घेतली होती. या प्रकरणी मुलीला दत्तक देताना कायदेशीर प्रक्रियेचा वापर न केल्यामुळे सहभागी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही बावळेकर यांचा मुलगा योगेशवर व्हॉट्स अपवर अश्लील चित्रफीत व्हायरल करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये खळबळ माजली असून पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai: भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग, काँग्रेस प्रचंड आक्रमक

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT