महाड: महिला सरपंचाच्या हत्येचा गुंता सुटला, 30 वर्षीय व्यक्तीला अटक; बलात्काराचाही गुन्हा दाखल
महाड: महिला सरपंचाच्या हत्येनंतर संपूर्ण महाड तालुक्यात खळबळ माजली होती. सोमवारी (27 डिसेंबर) झालेल्या या हत्या प्रकरणाचा आता छडा लावण्यात महाड पोलिसांना यश आलं आहे. संबंधित महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात फेकून देण्यात आला होता. त्यामुळे महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. याच प्रकरणी महाड […]
ADVERTISEMENT
महाड: महिला सरपंचाच्या हत्येनंतर संपूर्ण महाड तालुक्यात खळबळ माजली होती. सोमवारी (27 डिसेंबर) झालेल्या या हत्या प्रकरणाचा आता छडा लावण्यात महाड पोलिसांना यश आलं आहे. संबंधित महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात फेकून देण्यात आला होता. त्यामुळे महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. याच प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करुन हत्येचा तपास सुरु केला होता. याच तपासात आता पोलिसांना यश मिळालं असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या तपासात फारसे पुरावे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी यासाठी डॉग स्कॉडची मदत घेतली. डॉग स्क्वॉडची कामगिरी या तपासात अत्यंत महत्वपूर्ण ठरली. त्याच आधारे पोलिसांनी अमिर शंकर जाधव (वय 30 वर्ष) याला महाडमधील उवटआळी येथून अटक केली आहे.
महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पूर्वीच्या भांडणाचा राग धरून आरोपीने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचं त्यांनी यावेळी आपल्या जबाबात सांगितलं आहे.
हे वाचलं का?
सदर प्रकरणी दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 376 म्हणजे बलात्काराचा आरोप देखील आरोपीवर दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
ADVERTISEMENT
महाड तालुक्यातील एका गावच्या 42 वर्षीय सरपंच महिलेची निघृर्ण हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली होती.
ADVERTISEMENT
तुडील-भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला लाकडं आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली होती. गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत लाकडांची मोळी अस्त्यावस्त दिसून आली. पण आजूबाजूला कोणीही दिसलं नाही. त्यामुळे तरुणाला काहीसा संशय आला.
महाड: जंगलात सापडला महिला सरपंचाचा विवस्त्र मृतदेह, बलात्काराचा संशय
यामुळे सदर तरुणाने परिसरात आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याला रस्त्यालगत जंगल भागात एक महिला गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली. अज्ञात इसमाने डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करुन तिची हत्या केली असल्याचं यावेळी उघड झालं होतं. तसंच संबंधित महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने तिच्यावर अतिप्रसंग अथवा बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्यामुळे हत्येपूर्वी महिलेवर लैंगिक अत्याचार झाले असण्याची किंवा तसा प्रयत्न झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता. त्यामुळे त्याच दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला होता. अखेर गावकऱ्यांची चौकशी केल्यानंतर आणि डॉग स्क्वॉडकडून मिळालेल्या पुराव्यानंतर आरोपी अमिर याला अटक करण्यात आली. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT