महाराष्ट्रात दिवसभरात 20 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 94.86 टक्के
महाराष्ट्रात दिवसभरात 20 हजार 852 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 55 लाख 7 हजार 58 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 94.86 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 14 हजार 152 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 289 कोरोना बाधित मृत्यूंची […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 20 हजार 852 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 55 लाख 7 हजार 58 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 94.86 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 14 हजार 152 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 289 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.7 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतील Haji Ali दर्ग्याची लसीकरण केंद्रासाठी जागा देण्याची तयारी
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 60 लाख 31 हजार 395 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 5 हजार 565 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14 लाख 75 हजार 476 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 7 हजार 430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 1 लाख 96 हजार 894 Active रूग्ण आहेत. आज राज्यात 14 हजार 152 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 58 लाख 5 हजार 565 झाली आहे.
हे वाचलं का?
आज नोंद झालेल्या एकूण 289 मृत्यूंपैकी 193 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 96 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील 386 मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे तसेच आज राज्यातील 31 मे 2021 पर्यंतच्या मृत्यूंच्या रिकाँन्सीलीएशन प्रक्रियेत 702 मृत्यूंची वाढ झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 1088 ने वाढली आहे.
‘Home Isolation Ban : बंगला, फ्लॅटमध्ये राहणारे लोक Covid Center ला कसे येतील?’
ADVERTISEMENT
10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेल्या शहरांची नावं
ADVERTISEMENT
मुंबई – 18 हजार 261
ठाणे – 16 हजार 930
पुणे- 22 हजार 725
सातारा- 16 हजार 734
सांगली- 10 हजार 929
कोल्हापूर – 18 हजार 177
महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांमध्येच आता 10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT