महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 134 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 352 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 61 एकूण 61 लाख 86 हजार 223 कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के एवढं झालेलं आहे. आज राज्यात 5 हजार 758 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. राज्यात आज 134 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.11 टक्के एवढा […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 352 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 61 एकूण 61 लाख 86 हजार 223 कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के एवढं झालेलं आहे. आज राज्यात 5 हजार 758 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे. राज्यात आज 134 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.11 टक्के एवढा आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 7 लाख 59 हजार 767 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 87 हजार 863 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 73 हजार 812 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2512 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज 63 हजार 262 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 5 हजार 787 नवी नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 63 लाख 87 हजार 863 झाली आहे.
आज ठाणे मंडळातील कोविड मृत्यूंचे रिकाँन्सिलिएशन करण्यात आल्याने या मंडळाच्या आणि राज्याच्या एकूण कोविड मृत्यूंमध्ये 45 ने वाढ झाली आहे तर कोविडेतर मृत्यूमध्ये 2 ने घट झाली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT