वीज कापण्याशिवाय आता पर्याय नाही!, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ऊर्जा विभागाला थकबाकीचे मोठे संकट असल्याने उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. राज्यातील ऊर्जा विभाग संकटात असताना या खात्याचे मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. वीज तोडण्याशिवाय काही पर्याय आता उरलेला नाही असं नितीन राऊत यांनी या पत्रात नमूद केलं आहे. नितीन राऊत यांनी […]
ADVERTISEMENT
ऊर्जा विभागाला थकबाकीचे मोठे संकट असल्याने उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. राज्यातील ऊर्जा विभाग संकटात असताना या खात्याचे मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. वीज तोडण्याशिवाय काही पर्याय आता उरलेला नाही असं नितीन राऊत यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
ADVERTISEMENT
नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय मागणी केली आहे ते बघूया…..
हे वाचलं का?
पत्रातील मुद्दे :-
महावितरण ही ऊर्जा विभागाची अग्रणी कंपनी असून राज्यात २ कोटी ८० लाखाहुन अधिक वीज ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा करीत असते. हा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनी विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करीत असते.
ADVERTISEMENT
मागील २ वर्षात कोविड महामारी, निसर्ग, तोक्ते वादळ व इतर आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यामुळे महावितरण कंपनी कधी नव्हे इतक्या आर्थिक संकटात सापडली आहे. विशेषतः कृषी वीजपंप ग्राहकांकडे रूपये ४१ हजार १७५ कोटी इतक्या मोठया प्रमाणात वीजबील थकबाकी वाढली असून वसुलीचे प्रमाण मात्र नगण्य आहे. कृषीपंप धोरण- २०२० मुळे काही प्रमाणात वसुली होत असली तरी महावितरणचा ढासळणारा आर्थिक डोलारा थांबविण्यासाठी ही वसुली पुरेशी नाही.
ADVERTISEMENT
कृषी पंपांची वीज तोडल्यामुळे हर्षवर्धन पाटील आक्रमक, महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व सार्वजनिक पथदिवे यांच्याकडे अनुक्रमे २ हजार ६०७ व ६ हजार ३१६ कोटी अशी एकूण ९ हजार १३८ कोटींची थकबाकी झाली आहे
या विषयावर ग्रामविकास विभाग व नगरविकास विभागाचे सचिव, मंत्री ग्रामविकास व मंत्री नगरविकास यांच्या सह मा. उप मुख्यमंत्री यांच्या समवेत अनेक वेळा बैठका झाल्या तसेच या विषयावर तालुका पातळीपर्यंत वीज देयकांची पडताळणी करुन त्यात दुरुस्ती देखील करण्यात आली. तरी सुदधा उपरोक्त दोन्ही विभागाकडील निधी महावितरणला देण्यात आलेला नाही. तसेच ही बाब मी वेळोवेळी मंत्रीमंडळ बैठकीत आपल्या निर्दशनास आणलेली आहे. तसेच आपण त्यांस मान्यता दिली होती तरी सुध्दा सार्वजनिक पाणीपुरवठयाचे चालू देयक रूपये ३८० कोटी असताना केवळ ७ कोटी इतके देयक भरण्यात आले आहे. सार्वजनिक पथदिव्यांचे चालू देयक रूपये ८५७ कोटी असतांना केवळ ४ कोटी इतके नगण्य देयक महावितरणला भरण्यात आले आहे
या सर्व बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व जनतेला अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण बँकाकडून कर्ज घेत असते तथापी केंद्र शासनाच्या दि. १८.११.२०२१ च्या मार्गदर्शक सुचनानुसार कर्जाची मर्यादा २५ हजार कोटीवरून १० हजार कोटी इतकी खाली आणल्यामुळे महावितरणला आता यापुढे बँकेकडून कर्ज देखील घेता येत नाही. महावितरणवर अगोदरच ४५ हजार ५९१ कोटी इतके कर्ज असून रूपये १३ हजार ४८६ कोटी इतके वीजनिर्मिती कंपन्यांचे देणे बाकी आहे
या व्यतिरीक्त शासनाकडून पॉवर लुम, वस्त्रोउद्योग, कृषी तसेच विदर्भ, मराठवाडा व डी, डी+ या भागातील उद्योजकांना औद्योगिक सवलत देण्यात येते व हे अनुदान महावितरणला वेळेवर येणे अपेक्षित आहे तथापी एकंदरीत अनुदानाचा विचार करीता चालु वर्षातील मागणी तसेच मागील थकबाकीच्या अनुषंगाने रू. १३ हजार ८६१ कोटीच्या मागणी अन्वये केवळ ५ हजार ८८७ कोटी इतका निधी समायोजनाच्या माध्यमातुन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजेच रू. ७ हजार ९७८ कोटी इतके अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे
महावितरणकडून या वीजनिर्मिती कंपन्यांना वेळेत देणे देऊ शकत नसल्याने त्यांच्या व्याजात भर पडून महावितरणची परिस्थिती आणखी बिकट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कृषीपंप वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिवे यांचे थकीत देयके वसूल करण्यासाठी त्यांचे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम राबविण्याशिवाय महावितरणकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही
तरी या संदर्भात आपण आपल्या स्तरावरून पुनश्च: एकदा ग्रामविकास विभाग व नगरविकास विभाग यांचेकडील थकीत देयके तसेच शासनाकडील थकीत अनुदान तात्काळ महावितरण कंपनीला देण्याबाबत आदेशीत करावे आणि महावितरणची ढासळती आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT