ठाकरे सरकारने एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांची खरंच सुरक्षा काढली का?
शिवसेनेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांची सुरक्षा सरकारने काढून घेतली असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. सिद्धू मुसेवालाची हत्येचा संदर्भ देत संजय राऊत यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, […]
ADVERTISEMENT

शिवसेनेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांची सुरक्षा सरकारने काढून घेतली असल्याचा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. सिद्धू मुसेवालाची हत्येचा संदर्भ देत संजय राऊत यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि सर्व पोलीस आयुक्तांना हे पत्र देण्यात आलं आहे. या पत्रावर शिवसेनेकडून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेल्या १६ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आमदार असल्यामुळे प्रोटोकॉलनुसार आम्हाला घरी देण्यात सुरक्षा सुड भावनेनं बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आली आहे. इतकंच नाही, तर माध्यमातून समोर आलेल्या रिपोर्टमधून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून कार्यकर्त्यांकरवी हिंसा घडवून आणण्याचाही आम्हाला धमकावण्याचा अजेंडा आहे, असं या पत्रात म्हटलेलं आहे.
संजय राऊत यांच्याकडूनही धमकी दिली गेलीये, असंही या पत्रात म्हटलेलं आहे. सर्व आमदारांना सभागृहात येऊ द्या. जे आमदार सोडून गेलेत, त्यांना बघून घेऊ. परत आल्यानंतर आणि महाराष्ट्रात फिरताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागले, असं राऊत म्हणाले असल्याचं आमदारांचं म्हणणं आहे.
