परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख राजीनामा देणार का??
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंकडून अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचं परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. परमबीर सिंगांच्या या पत्रानंतर सचिन वाझे प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं आहे. काही […]
ADVERTISEMENT
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. NIA च्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंकडून अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचं परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे. परमबीर सिंगांच्या या पत्रानंतर सचिन वाझे प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं आहे. काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यातच परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर आता अनिल देशमुख राजीनामा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
ADVERTISEMENT
परंतू अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सिंग यांचं पत्र प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन परमबीर सिंग स्वतःला वाचवण्यासाठी खोटा आरोप करत असल्याचं म्हटलं आहे.
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात गेल्या महिन्याभरापासून विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहे. विशेषकरुन अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमक पवित्र्यासमोर गृहमंत्री अनिल देशमुख बॅकफूटवर गेलेले पहायला मिळाले. यानंतर NIA ने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर अनेक धागेदोरे समोर यायला लागले. ज्यानंतर विरोधी पक्षाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांना भेटून आले, त्यावेळी देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतू आपल्या राजीनाम्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. यानंतर परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आता आपल्या पदाचा राजीनामा देणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT